Pune Drug Case | ड्रग्स माफिया ललितच्या जीवाला धोका असल्याचा वकिलांचा दावा ! ललित पाटीलला 7 नोव्हेंबर पर्य़ंत पोलीस कोठडी

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन –  Pune Drug Case | पुण्यातील ससून हॉस्पिटलमधून पळून गेलेल्या ड्रग्स माफिया ललित पाटील (Drug Mafia Lalit Patil) याला मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) साकीनाका पोलिसांनी परराज्यातून अटक केली. त्यानंतर पुणे पोलिसांनी (Pune Police) काल ललित पाटील याचा ताबा घेऊन रात्री उशिरा पुण्यात आणले. आज त्याला न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावण्यात आली. पुणे पोलिसांकडून ललितच्या जीवाला धोका असल्याचा दावा यावेळी ललित पाटीलच्या वकिलांनी केला आहे. (Pune Drug Case)

पुणे पोलिसांनी ललित पाटीलच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र, ललित पाटीलच्या वकिलांनी त्याला आक्षेप घेतला. ललित पाटीलच्या जीवाला पुणे पोलिसांकडून धोका असल्याचं त्याच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. ललित पाटील ससुन हॉस्पिटलमध्ये असताना त्याला पोलिसांकडून बेदम मारहाण झाल्याचा दावा वकिलांनी केला आहे. तसेच ललित पाटील आजारी असून त्याच्यावर हार्नियाची शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे सांगत ललित पाटीलच्या वकिलांकडून पोलीस कोठडीला विरोध करण्यात आला.

पुणे पोलिसांनी ललितचा आर्थर रोड कारागृहातून (Arthur Road Jail) ताबा घेतला. पाटील याच्यासह शिवाजी शिंदे
आणि रोहित कुमार चौधरी (Rohit Kumar Chaudhary) हे आरोपी देखील पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
ललित पाटील 2 ऑक्टोबरला रुग्णालयातून पळून गेल्यानंतर पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर साकीनाका पोलिसांनी त्याला अटक केली होती. (Pune Drug Case)

ललित पाटील याला साकिनाका पोलिसांनी अटक केली त्यावेळी त्याने मोठा खुलासा केला होता.
मी ससूनमधून पळालो नाही मला पळवण्यात आलं आहे, असे त्याने म्हटले होते.
त्याच्या या दाव्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. त्यानंतर पुणे पोलीस, येरवडा कारागृह प्रशासन आणि ससून व्यवस्थापन यांच्यावर संशयाची सुई वळली होती.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.