Pune Crime News | फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 30 लाखांची फसवणूक, कोंढवा येथील घटना

Pune Crime News | 85-year-old groom trapped in love trap, 11 lakh 45 thousand swindled

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | फ्लॅट विक्री करण्याच्या नावाखाली पैसे घेऊन फ्लॅट नावावर न करता 30 लाखांची आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी कोंढवा येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार सन 2011 ते 2015 दरम्यान कोंढवा येथे घडला आहे. (Pune Crime News)

अब्दुल मोबिन शेख (वय-63 रा. कौसरबाग सोसायटी, कोंढवा, पुणे) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईम्रान तालुकदार खान Imran Talukdar Khan (वय-44 रा. युनिटी पार्क, कोंढवा खुर्द, पुणे) याच्यावर आयपीसी 420, 406, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सी.आर.पी.सी. 156(3) नुसार कोंढवा पोलिसांनी (Pune Police) गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याचा कोंढवा खुर्द येथील युनिटी पार्कमधील (Unity Park Kondhwa Khurd) फ्लॅट नंबर 801 विकायचा असल्याचे फिर्यादी यांना सांगितले. फिर्यादी यांना फ्लॅट घेयचा असल्याने त्यांनी आरोपी ईम्रान खान यांच्यासोबत फ्लॅटचा व्यवहार केला. खान याने फिर्यादी शेख यांना फ्लॅट 35 लाख रुपयांना विकला. व्यवहार ठरल्यानंतर शेख यांनी खान याला आर.टी.जी.एस व रोख स्वरुपात 30 लाख रुपये दिले. (Pune Crime News)

पैसे दिल्यानंतर अब्दुल शेख यांनी फ्लॅट नावावर करुन देण्यास सांगितले. मात्र, ईम्रान खान याने फ्लॅट नावावर करुन
देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे फिर्य़ादी यांनी पैसे परत मागितले असता इम्रान खान याने फिर्यादी शेख यांना
जिवे मारण्याची धमकी (Threats to kill) देऊन शिवीगाळ केली. याप्रकरणी अब्दुल शेख यांनी न्यायालयात दाद मागितली.
न्यायालयाच्या आदेशानुसार कोंढवा पोलिसांनी ईम्रान खान याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनवणे (PSI Sonwane) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा