Deepak Mankar On Maratha Reservation | ‘मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्या’, राष्ट्रवादीचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

Deepak Mankar On Maratha Reservation

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Deepak Mankar On Maratha Reservation | सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. या मुद्यावरुन राज्यभरात मराठा समाजाची आंदोलने, निदर्शने सुरु आहेत. याच दरम्यान पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी मुख्यमंत्री एकानाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांना पत्र लिहिले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढत असून समाजाची भावना आणि गरज लक्षात घेता मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, अशी मागणी दीपक मानकर यांनी केली आहे. (Deepak Mankar On Maratha Reservation)

दीपक मानकर यांनी पत्रात म्हटले की, संपूर्ण महाराष्ट्रात आरक्षणासाठी मराठा समाजाच्या चालू असलेल्या लढ्याची व्याप्ती दूरवर पोहोचली आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखालील हा लढा अधिकच तीव्र होत चालला आहे. या लढ्याची व्याप्ती आणि आत्ताची सामाजिक परिस्थिती पाहता तसेच समाजाच्या भावना लक्षात घेता आरक्षणाचा निर्णय तातडीने घेणे गरजेचे आहे, असे वाटते. (Deepak Mankar On Maratha Reservation)

दीपक मानकर यांनी पुढे म्हटले की, सकल मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. त्यांच्या या लढ्यास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर शाखेतर्फे पूर्ण पाठिंबा आहे. राज्य शासनानेदेखील मराठा समाजास कोणत्याही कायदेशीर त्रुटी न ठेवता त्वरित आरक्षण देण्याचे सकारात्मक पाऊल उचलावे आणि समाजास न्याय मिळवून द्यावा, असे आवाहनही त्यांनी एकनाथ शिंदे यांना या पत्रात केले आहे.