Pune Drug Case | ललित पाटील पलायन प्रकरण : ससूनच्या कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Drug Case | पुण्यातील ससून हॉस्पिटलच्या (Sasoon Hospital Drug Racket) कैदी रुग्ण समितीचे अध्यक्ष डॉ. सुधीर धिवारे (Dr. Sudhir Dhiware) यांनी तडकाफडकी राजीनामा (Resignation) दिला आहे. ललित पाटील ड्रग्स प्रकरणात (Lalit patil Drug Case) संशयाच्या भोवऱ्यात आढळल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. 27 सप्टेंबरला त्यांची कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षपदी (Chairman of Prisoner Patients Committee) नियुक्ती करण्यात आली होती. परंतु सध्या ससून रुग्णालयात सुरु असलेला प्रकार आणि ललित पाटील प्रकरणाशी (Pune Drug Case) त्यांचा काहीही संबंध नाही. परंतु उगाच त्यांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न सुरु असल्याने त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

कैदी रुग्ण समितीचे काय काम असते?

ससूनमधील वॉर्ड क्रमांक 16 मध्ये कैदी रुग्णांवर उपचार केले जातात. या वॉर्डमध्ये येरवडा कारागृहातील (Yerwada Jail) रुग्णांवर उपचार केले जातात. यात कैद्यावर कोणते उपचार करायचे याचा निर्णय ही समिती घेत असते आणि त्यांना किती दिवस रुग्णालयात ठेवायचे याचा देखील निर्णय हीच समिती घेते. परंतु, ललित पाटील प्रकरणासंदर्भात आता नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. ललित पाटीलसंदर्भात सर्व निर्णय ही समिती घेत नसून ससून हॉस्पिटलचे डीन डॉ. संजीव ठाकूर (Dean Dr. Sanjeev Thakur) आणि त्यांच्यापूर्वीचे डीन घेत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला कंटाळून डॉ. सुधीर धिवारे यांनी राजीनामा दिला आहे.

ललित पाटील प्रकरणाशी धीवारेंचा संबंध नाही

ललित पाटील याने 2 ऑक्टोबर रोजी ससून हॉस्पिटलमधून पलायन केले. मात्र, त्याच्या काही दिवस आधीच म्हणजे
27 सप्टेंबरला धिवारे यांनी अध्यक्षपद स्विकारलं होतं. मात्र, त्यानंतर लगेच त्यांचा ललित पाटील प्रकरणाशी संबंध
नसताना त्यांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच पाटील याला मदत केल्याचा कोणताही पुरावा किंवा चौकशीतून समोर आले नाही. परंतु या प्रकरणाची जबाबदारी त्यांनी स्वत:कडे घ्यावी असा दबाव ससून व्यवस्थापनाकडून त्यांच्यावर टाकण्यात येत होता. या सगळ्याला कंटाळून त्यांनी राजीनामा दिला आहे. (Pune Drug Case)

ललित पाटीलला टीबी झाल्याचे पत्र

ड्रग्स माफिया ललित पाटीलचा ससून रुग्णालयातील मुक्काम वाढावा यासाठी त्याला वेगवेगळे आजार असल्याचं
कागदोपत्री दाखवण्यात येत होतं. ससूनमध्ये उपचारासाठी भरती झालेल्या ललित पाटीलची माहिती घेण्यासाठी येरवडा
कारागृहाकडून विचारणा झाल्यानंतर डॉ. संजीव ठाकूर यांनी ललित पाटील याला टी.बी. झाल्याचे उत्तर या पत्रात दिलं आहे.
ललित पाटील याला तीन वर्षांच्या कालावधीमध्ये अनेक आजार झाल्याचे ससून रुग्णालयाने दाखवले आहे.
या पत्रावर सुधीर धिवारे यांची देखील स्वाक्षरी आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.