Maratha Reservation | पुण्यात मराठा आरक्षणासाठी ज्येष्ठाची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिलं – ‘शासन स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त जनतेच्या…’

0

आळंदी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – मराठा आरक्षण (Maratha Reservation) मिळत नसल्याने तसेच मुलाला अनुकंपावर नोकरी मिळत नसल्याने तो बेरोजगार फिरत असल्याच्या नैराश्यातून एका ज्येष्ठाने आत्महत्या (Suicide Case) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील आळंदी येथे घडली आहे. आळंदी येथील इंद्रायणी नदीत त्यांचा मृतदेह आज सकाळी आढळला. या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली आहे. (Maratha Reservation)

आत्महत्या केलेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव व्यंकट ढोपरे Venkat Dhopre (वय ६० वर्षे, मूळ रा उमरदरा, ता. शिरूर आनंदपाळ, जिल्हा लातूर, सध्या रा नऱ्हे आंबेगाव) असे आहे. ते सध्या कुटुंबियांसोबत पुण्यातील नऱ्हे आंबेगाव येथे राहातात. आळंदी येथील इंद्रायणी नदीवरील सिद्धबेट बंधाऱ्यात उडी मारून त्यांनी आत्महत्या केली आहे.

व्यंकट ढोपरे यांनी मृत्यूपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे की, मराठ्यांना आरक्षण मिळाले पाहिजे. मुलाला सरकारी खात्यात अंशकालनी तत्वावर नोकरी न मिळाल्याचे, सरकारी चुकीच्या कार्यपद्धतीमुळे मुलगा बेकार फिरत असल्याने अस्वस्थ आहे.

स्वतः सरपंच असताना निराधारांसाठी अनुदान मिळावे यासाठी प्रयत्न केले. त्याला यश आले नाही. अनेक वेळा मराठा आंदोलनात संघर्ष केला. (Maratha Reservation)

हे शासन स्वतःची खळगी भरण्यात व्यस्त असून त्यांना जनतेच्या प्रश्नाचं काही पडलं नाही.
न्याय मिळत नसल्याने निराशेपोटी आत्महत्या करत आहे, असे ढापरे यांनी चिट्टीत म्हंटले आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास आळंदी पोलीस (Alandi Police Station) करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.