Pune Crime News | जप्तीचा आदेश घेऊन गेलेल्या वकिलाला दमदाटी, खराडी परिसरातील प्रकार; तिघांवर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | न्यायालयाकडून मिळालेल्या आदेशानुसार मिळकत जप्त करण्यासाठी गेलेल्या वकिलाला एका कुटुंबाने दमदाटी करुन सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा प्रकार खराडी परिसरात घडला आहे. याप्रकरणी कुटुंबातील तिघांवर चंदननगर पोलीस ठाण्यात (Pune Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जून 2023 रोजी खराडी येथील संघर्ष चौकाजवळ घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत अॅड. अभिजीत सुरेंद्र लोंढे Adv. Abhijeet Surendra Londhe (वय-38 रा. रामनगर, वडगाव शेरी, पुणे) यांनी रविवारी (दि.29) चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandannagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. त्यानुसार रविंद्र बापुराव सणस (Ravindra Bapurao Sans) व त्यांच्या पत्नी आणि मुलीवर आयपीसी 363, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार सीआरपीसी कलम 156(3) नुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे व्यवसायाने वकिल आहेत. आरोपींनी त्यांच्या मिळकतीवर श्रीराम फायनान्स कंपनीकडून (Shreeram Finance Company) कर्ज घेतले आहे. मात्र, त्यांनी कर्जाची वेळेत परतफेड केली नाही. त्यामुळे फायनान्स कंपनीच्या वतीने अॅड. लोंढे यांनी कोर्टाकडून मिळकत जप्तीचा आदेश प्राप्त केला होता. अॅड. लोंढे हे न्यायालयाने दिलेल्या मिळकत जप्तीचा आदेश घेऊन आरोपींची मिळकत जप्त करण्यासाठी गेले होते. (Pune Crime News)

त्यावेळी आरोपींनी फिर्यादी यांना मिळकत जप्त करण्यास विरोध केला. तसेच आरडाओरडा करुन फिर्यादी यांच्यासोबत
वाद घालून त्यांना दमदाटी केली. ‘आम्ही मरण पत्करु पण मिळकत देणार नाही’ असे म्हणत आरोपींनी गोंधळ घातला.
आरोपींनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन न करता फिर्यादी हे करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक कांबळे (API Kamble) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.