Pune Crime News | अल्पवयीन मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्या 55 वर्षाच्या नराधमाला अटक, हडपसर मधील घटना

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | एका अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना फुरसुंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी 55 वर्षाच्या नराधमावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी (Pune Police) त्याला अटक केली आहे. हा प्रकार शनिवारी (दि.28) रात्री नऊच्या सुमारास फुरसुंगी येथे घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पीडित मुलीच्या आईने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी यशवंत काळुराम जाधव Yashwant Kaluram Jadhav (वय-55 रा. फुरसुंगी) याच्यावर आयपीसी 354, पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच परिसरात राहतात.
फिर्यादी यांची तीन वर्षाची मुलगी आरोपीच्या नातीसोबत खेळण्यासाठी त्याच्या घरी गेली होती. त्यावेळी आरोपीने त्यांच्या मुलीसोबत अश्लील चाळे केले. हा प्रकार मुलीच्या आईला समजताच त्यांनी हडपसर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरुद्ध तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक खळदे (PSI Khalde) करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Leave A Reply

Your email address will not be published.