Pune News | मेट्रो, उड्डाणपुलाचे काम करताना जेसीबीने २० दिवसांमध्ये ३६ ठिकाणी वीजवाहिन्या तोडल्या, १९ हजार ग्राहकांना फटका

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune News | शहरात ठिकठिकाणी उड्डाणपुल (Flyover ) आणि मेट्रोचे (Pune Metro) काम वेगाने सुरू आहे. यापैकी गणेशखिंड, शिवाजीनगर परिसरात मेट्रो आणि उड्डाणपुलासाठी रस्ता रूंदीकरणाचे काम सुरू असताना जेसीबीने खोदकामात करताना मागील २० दिवसांत ३६ ठिकाणी महावितरणच्या (Mahavitran) भूमिगत वीजवाहिन्या (Underground Power Line) तोडल्या आहेत. यात सदाशिव पेठ, नारायण पेठ, शिवाजीनगर, गणेशखिंड परिसरातील सुमारे १९ हजार वीजग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. (Pune News)

भूमिगत वीजवाहिन्या जेसीबीने तोडल्याने आणि वीजपुरवठा खंडित झाल्याने महावितरणचे वीजविक्रीचे सुमारे १७ लाख १६ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शिवाय, ग्राहकांच्या मनस्तापाला सुद्धा महावितरणला सामोरे जावे लागत आहे.

सदाशिव पेठ, नारायण पेठ, लक्ष्मीरोड, मॉडेल कॉलनी, रेंज हिल्स रस्ता, आयसीएस कॉलनी, भोसलेनगर, अशोकनगर, साखर संकुल, वाकडेवाडी, फर्ग्युसन रस्ता, गणेशखिंड रस्ता, शिवाजीनगर रेल्वे स्थानक परिसर, हर्डीकर हॉस्पिटल, आकाशवाणी, कासारवाडी या परिसरातील सुमारे १९ हजार ग्राहकांना संचेती हॉस्पिटल ते विद्यापीठ रस्त्याबाजूच्या भूमिगत वीजवाहिन्यांमधून वीजपुरवठा केला जातो.

दररोज वीजवाहिन्या तोडण्याचा प्रकार सुरू आहे. एकाच दिवशी तब्बल सहा ठिकाणी भूमिगत वीजवाहिन्या तोडल्याचे प्रकार घडले आहेत. (Pune News)

रस्ता रूंदीकरणासाठी भूमिगत वीजवाहिन्या स्थानांतरीत करण्याची विनंती महावितरणने केली होती.
मात्र, सध्याच्या भूमिगत वीजवाहिन्यांवरच रस्ता तयार केला जात आहे.
भविष्यात नादुरुस्त वीज पुरवठ्याचा प्रश्न
गंभीर होणार आहे. या रस्त्याखाली दबलेल्या वीजवाहिन्यांची दुरुस्ती सततच्या वाहतुकीमुळे अवघड होणार आहे.
पर्यायी स्वरुपाच्या वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध करून देताना मोठ्या कालावधीसाठी वीज खंडीत राहू शकतो.
या मुळे वीज ग्राहकांसोबतच महावितरणलाही मोठा भुर्दंड बसणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.