Pune Crime-Murder News | सिंहगड रस्ता परिसरात सराईत गुन्हेगारावर गोळीबार, दोन संशयित ताब्यात

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime-Murder News | घोरपडे पेठेत तरुणावर गोळीबार करून त्याचा खून करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच सोमवारी (दि.30) संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सिंहगड रास्ता (Sinhagad Road Police Station) परिसरात एका सराईत गुन्हेगारावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. (Pune Crime-Murder News)

ओंकार तानाजी लोहकरे Omkar Tanaji Lohkare (वय 19, रा. जाधवनगर, धायरी) याच्यावर दोघा अल्पवयीन मुलांनी गोळीबार केला. बाल सुधारगृहात असताना त्यांच्यात वाद झाला होता. त्यातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. (Pune Crime-Murder News)

परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त सुहेल शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिंहगड रस्ता पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका सराईत गुन्हेगारावर देशी बनावटीच्या पिस्तुलातून गोळीबार करण्यात आला. आरोपींनी दोन राऊंड फायर (Firing In Pune) केले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे.
पोलिस संशयित आरोपींकडे कसून चौकशी करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.