Pune Crime News | मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत दाम्पत्याला सिंहगड पोलिसांकडून अटक, 14 सायकली जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | पुणे शहरातील सिंहगड रोड परिसरातून महागड्या सायकली चोरणाऱ्या सुशिक्षीत दाम्पत्याला पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून साडे तीन लाखांच्या 14 सायकली जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहे. मौजमजा करण्यासाठी या दाम्पत्याने महागड्या सायकली चोरल्याचे तपासात समोर आले आहे. (Pune Crime News)

विजय राजेंद्र पाठक Vijay Rajendra Pathak (वय-26 सध्या रा. तळेगाव, मुळ रा.राक्रिश अपार्टमेंट, अंबरनाथ (इस्ट), ठाणे), डायना डेंझिल डिसोजा Diana Denzil D’Souza (वय-25 सध्या रा. तळेगाव) असे अटक केलेल्या आरोपींचे नावं आहेत. सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या (Sinhagad Road Police Station) हद्दीतील अभिनव चिल्ड्रेन स्कूल समोरील मंदार अपार्टमेंटच्या पार्किंगमधून स्नेल फिफ्टर कंपनीची (Snail Fifter Company) महागडी सायकल (Bicycle) चोरीला गेल्याची फिर्याद 6 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी परिसरातील 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. 26 ऑक्टोबर रोजी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे पोलीस अधिकारी व अंमलदार हे पेट्रोलिंग करत होते. तपास पथक वडगाव ब्रिजजवळ आले असता पोलीस अंमलदार सागर शेडगे व राहुल ओलेकर यांना एका काळ्या दुचाकीवरुन दोघेजण सायकल घेऊन जात असता संशयीतरित्या दिसून आले. पोलिसांनी त्यांना थांबवून सायकल बाबत चौकशी केली. मात्र त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीस पथकाने दोघांना पोलीस ठाण्यात आणून सखोल चौकशी केली. चौकशी दरम्यान विजय पाठक हा डायना
डिसोझा हिच्या मदतीने मौजमजा करण्यासाठी महागड्या सायकल चोरी करत असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे अधिक तपास केला असता या सुशिक्षीत दाम्पत्याने नामांकित कंपनीच्या महागड्या सायकल चोरल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून साडे तीन लाख रुपये किंमतीच्या 14 सायकली जप्त केल्या असून तीन गुन्हे उघडकीस आले आहेत. पुढील तपास सहयक पोलीस निरीक्षक सचिन निकम (API Sachin Nikam) करीत आहेत. (Pune Crime News)

ही कारवाई पोलीस उपायुक्त परिमंडळ-3 सुहेल शर्मा (DCP Suhail Sharma), सहायक पोलीस आयुक्त सिंहगड रोड
विभाग आप्पासाहेब शेवाळे (ACP Appasaheb Shewale), वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन
(Sr PI Abhay Mahajan), पोलीस निरीक्षक गुन्हे जयंत राजुरकर (PI Jayant Rajurkar) यांच्या मार्गदर्शनाखाली
सहायक पोलीस निरीक्षक सचिन निकम, पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesh Mokashi),
पोलीस अंमलदार आबा उत्तेकर, संजय शिंदे, राहुल ओलेकर, सागर शेडगे, अमोल पाटील, देवा चव्हाण, विकास पांडुळे,
विकास बांदल, अविनाश कोंडे, दक्ष पाटील, स्वप्नील मगर यांच्या पथकाने केली.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.