Pune Crime News | दरवाजा उघडला, काही समजण्याच्या आतच तो गोळी झाडून निघून गेला; खुनाच्या घटनेने पुणे हादरलं

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | एका अज्ञात व्यक्तीने मध्यरात्री घरी येऊन बंदूकीतून गोळी (Pune Firing News) झाडून एकाचा खून (Murder In Pune) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील घोरपडे पेठेत घडली आहे. अनिल रामदेव साहू Anil Ramdev Sahu (वय-35) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी एका अनोळखी व्यक्तीवर खडक पोलीस ठाण्यात (Khadak Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मयत व्यक्तीचा भाऊ घुरणकुमार हरिदेव साहु (वय-24 रा. श्रीमंत सुवर्णभारत मित्र मंडळाजवळ, घोरपडी पेठ पुणे मुळ रा. वाजीतपुर, जि. दरभंगा, बिहार) यांनी फिर्याद दिली आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साहू कुटुंबीय मूळचे बिहार राज्यातील दरभंगा जिल्ह्यातील आहेत. मात्र, कामानिमित्त ते पुण्यात आले आणि घोरपडे पेठेत राहू लागले. घोरपडे पेठेतील श्रीकृष्ण हाईट्स या इमारतीत ते राहत होते. रविवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास गाढ झोपेत असताना अचानक दरवाजा वाजला. फिर्यादी घुरणकुमार जागे झाले. त्यांनी दरवाजा उघडला असता समोर दाढीमिशा असलेला, अंगाने जाड अनोळखी व्यक्ती उभा होता. (Pune Crime News)

अनोळखी व्यक्तीने फिर्यादी यांना ‘तेरा भाई किधर है, उसको बुला’ असे सांगितले.
त्यानंतर फिर्यादी यांनी किचनमध्ये हेडफोन लावून बसलेल्या अनिल साहू यांना बाहेर आलेल्या व्यक्तीविषयी सांगितले.
अनिल साहू बाहेर गेले आणि त्या व्यक्तीसोबत बोलत होते. बोलत असताना त्या व्यक्तीने अनिल यांना काहीतरी विचारलं.
त्यावर अनिल यांनी मान हलवून नकार दिला. आणि त्यानंतर त्या व्यक्तीने कपाळावर बंदूक लावून गोळी झाडली
आणि त्यांचा खून (Pune Murder News) केला. त्यानंतर आरोपी इमारतीच्या बाहेर थांबलेल्या एका दुचाकीवर अज्ञात साथीदारासह दुचाकीवरुन पळून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास खडक पोलीस करीत आहेत.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.