Blood Sugar | कोणते पदार्थ वाढवतात ब्लड शुगर आणि कोणते कमी करतात? येथे पहा यादी

Blood Sugar | which foods can control blood sugar know what kind of foods avoid in your diet for manage diabetes

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Blood Sugar | मधुमेह (Diabetes) हा इतका वाईट आजार आहे की तो एकदा झाला की तो कायम आपल्यासोबत राहतो. खराब जीवनशैली (lifestyle), ताणतणाव (stress) आणि खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे (eating habits) हा आजार होतो. तो अनेक जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतो. मधुमेहावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात बदल करणे अत्यंत आवश्यक असते. (Blood Sugar)

ज्या लोकांची ब्लड शुगर जास्त (high blood sugar level) आहे, अशा लोकांनी नियमित औषधे घ्यावीत आणि ज्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (glycemic index) कमी असेल अशा गोष्टींचा आहारात समावेश करावा. कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ (low glycemic index food) ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतात.

सर्वसाधारणपणे, जे पदार्थ ब्लड शुगर लेव्हल सर्वात जास्त वाढवतात ते कार्बोहायड्रेट्स समृध्द असतात. पांढरा भात आणि ब्रेडमध्ये रिफाईंड कार्बोहायड्रेट्स असतात आणि त्यात प्रथिने आणि फायबर कमी असतात, ज्यामुळे ते साखर वेगाने वाढवतात. (Blood Sugar)

साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी व्यायाम आणि औषधे खूप महत्त्वाची आहेत, पण साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी आहार खूप महत्त्वाचा आहे. साखर नियंत्रित करण्यासाठी तुम्ही तुमच्या आहार योजनेत कोणते पदार्थ समाविष्ट करू शकता ते जाणून घ्या. (Blood Sugar)

1. आहारात करा अ‍ॅव्होकॅडोचा समावेश (Include avocado in the diet) :

एवोकॅडो हे शुगरच्या रुग्णांसाठी उत्तम आहे, ज्यामध्ये साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. हे ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करते, तसेच शरीराला ऊर्जा देते.
एवोकॅडोमध्ये हाय फॅट आणि लो कार्बोहायड्रेट असते जे ब्लड शुगर नियंत्रित (Blood Sugar Level Control)करते. याच्या सेवनाने वजनही कमी होते.

2. मासे खा (Eat Fish) –

मासे हा प्रोटीनचा (Protein) उत्तम स्रोत आहे. त्यात फॅटचे प्रमाण कमी असते. ते ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिडचा उत्तम स्त्रोत आहे. साखरेच्या रुग्णांसाठी याचे सेवन करणे फायदेशीर आहे.

3. लसूण सेवन करा (Eat Garlic)

सणात ब्लड शुगर मॅनेज (Manage Blood Sugar) करण्याची क्षमता असते.
लसणाच्या सेवनाने फास्टिंग शुगर नियंत्रणात (Fasting sugar control)
ठेवता येते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे. लसणाचा
ग्लायसेमिक इंडेक्स 10-30 असतो, जो खूप कमी असतो, जो ब्लड शुगर लेव्हल नियंत्रित करतो.

4. आहारात करा हिरव्या पालेभाज्यांचा समावेश (Include green leafy vegetables in your diet)

हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन ए (Vitamin A) सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक ब्लड शुगरचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आपल्या आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. हिरव्या पालेभाज्यांमध्ये तुम्ही प्रामुख्याने पालकचे सेवन करावे.

5. चिया सीड्स करते शुगर कंट्रोल (Sugar control by chia seeds:)

चिया सीड्समध्ये फायबर (Fiber), फॅट (Fats), ओमेगा-3 (Omega-3),
कॅल्शियम (Calcium) आणि अँटिऑक्सिडंट्स (Antioxidants) भरपूर असतात.
चिया सीड्स कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते, असे अनेक अभ्यासातून समोर आले आहे.
त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स 1 आहे, जो शुगर नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे.

ब्लड शुगर त्वरीत वाढवणारे हे पदार्थ टाळा

– बटाटे, व्हाईट ब्रेड, पांढरा भात, तळलेले पदार्थ, मांस आणि कॅन्ट फूड.

(Disclaimer :- वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

Web Title :- Blood Sugar | which foods can control blood sugar know what kind of foods avoid in your diet for manage diabetes

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Exercise During Period | पीरियड्समध्ये वर्कआऊट करणे योग्य की चुकीचे? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

Blood Sugar | बटाटा खाल्ल्याने वाढू शकते का ब्लड शुगर? जाणून घ्या काय आहे सत्य

Bath During Periods | तुम्हाला मासिक पाळी दरम्यान आंघोळ करण्याची योग्य पद्धत माहिती आहे का?; जाणून घ्या