Iron Rich Food | हिमोग्लोबिनच्या कमतरतेमुळे शरीरात होत असेल आयर्नची कमतरता, तर ‘या’ 6 खाद्यपदार्थांनी होईल फायदा

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन टीम  – Iron Rich Food | शरीरात हिमोग्लोबिनच्या (Hemoglobin) कमतरतेमुळे आयर्नची (Iron) कमतरता निर्माण होते. आयर्नच्या कमतरतेमुळे अनेक प्रकारच्या समस्या शरीरात निर्माण होऊ शकतात. ही कमतरता भरून काढण्यासाठी काही पदार्थांचा तुम्ही आहारात समावेश करू शकता. हे पदार्थ कोणते जाणून घेवूयात. (Iron Rich Food)

1. डाळिंब (Pomegranate)
आयर्नच्या कमतरतेवर मात करण्यासाठी डाळिंब देखील एक चांगला पर्याय आहे. डाळिंबाचा रस प्यायल्याने अ‍ॅनिमियासारख्या (Anemia) आजारांपासून सुटका मिळते.

2. बीट (Beat)
शरीरातील आयर्नची कमतरता भरून काढण्यासाठी बीटरूट हा उत्तम स्रोत आहे. बीटरूट खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते. अ‍ॅनिमिया झाल्यास बीटरूट खाण्याचा सल्ला दिला जातो.

3. पेरू (Guava)
आयर्न आणि ‘व्हिटॅमिन सी’च्या (Vitamin C) कमतरतेसाठी तुम्ही पेरूचा आहारात समावेश करू शकता. पेरू चांगला पिकलेला असावा. (Iron Rich Food)

4. तुळशीची पाने (Basil Leaves)
तुळशीच्या पानांनी रक्ताची कमतरता कमी होऊ शकते. तुळशीची पाने नियमित खाल्ल्याने शरीरातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.

5. पालक (Spinach)
पालकात भरपूर लोह असते. हिमोग्लोबिनची कमतरता असल्यास पालकाचा आहारात समावेश करावा. पालकामध्ये कॅल्शियम, सोडियम, खनिज क्षार, क्लोरीन, फॉस्फरस आणि प्रथिने यांसारखे घटक असतात.

6. अंडे (Eggs)
अंड्यामध्ये प्रोटीन, जीवनसत्त्वे, खनिजे, आयर्न आणि कॅल्शियम आढळते. याशिवाय अंड्यामध्ये व्हिटॅमिन डी देखील असते. अंड्यामध्येही भरपूर प्रमाणात लोह असते.

Related Posts