Long Covid Symptoms | रिकव्हरीनंतर सुद्धा त्रस्त करतात ओमिक्रॉनची ‘ही’ लक्षणे

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  – Long Covid Symptoms | जॉय कोविड स्टडी अ‍ॅप (Joi Kovid Study App) च्या नवीन आकडेवारीनुसार, पाठीच्या खालील दुखणे (low back pain) हे ओमिक्रॉन व्हेरिएंट (Omicron variant) मधील आठ नवीन लक्षणांपैकी (symptoms) एक आहे. दक्षिण आफ्रिकेत या व्हेरिएंटचा शोध लागल्यावर हा गुणधर्म सापडला. वॉशिंग्टन पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, डॉक्टरांकडे ओमिक्रॉन संसर्गामुळे पाठदुखीची तक्रार करणार्‍या रुग्णांची संख्या वाढली आहे. (Long Covid Symptoms)

आणखी चिंतेची बाब म्हणजे कोविड चाचणी निगेटिव्ह आल्यानंतरही हे लक्षण कायम दिसत आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य असली तरी दीर्घकाळ कोविड होण्याची शक्यता नाकारता येत नाहीत.

ओमिक्रॉनची लक्षणे सौम्य, परंतु किरकोळ समजू नये
अनेक तज्ञांनी असे सुचवले आहे की हा नवीन व्हेरिएंट सौम्य आहे आणि यामुळे सौम्य सर्दी किंवा फ्लू सारखी लक्षणे दिसू शकतात. मात्र, आघाडीच्या आरोग्य संस्था आणि प्रमुख डॉक्टरांनी कोणत्याही निष्कर्षावर जाण्याविरुद्ध इशारा दिली आहे. (Long Covid Symptoms)

WHO ने ओमिक्रॉनबद्दलही स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ओमिक्रॉन हे सामान्य सर्दी-खोकल्यासारखे नाही. हे सर्दीपेक्षा बरेच काही आहे, जे तुम्हाला रुग्णालयात दाखल देखील करू शकते आणि यामुळे अनेकांनी आपला जीव सुद्धा गमवावा आहे. तसेच, जे लोक ओमिक्रॉनने संक्रमित आहेत त्यांना लाँग कोविड होण्याची शक्यता असते.

आतापर्यंत दिसून आली अशी लक्षणे
ओमिक्रॉन व्हेरिएंट अत्यंत संसर्गजन्य आहे, परंतु डेल्टापेक्षा सौम्य आहे. सौम्य ताप, घसा खवखवणे, शरीरात तीव्र वेदना,
रात्री घाम येणे, नाक वाहणे, शिंका येणे, उलट्या होणे आणि भूक न लागणे ही ओमिक्रॉनचे लक्षण असू शकतात.

Related Posts