Pimpri Drug Case | पिंपरी : एमडी ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या परराज्यातील दोघांना अटक, तीन लाखांचा मुद्देमाल जप्त

0

पिंपरी : – Pimpri Drug Case | महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Mahalunge MIDC Police Station) हद्दीतून तीन लाख रुपये किमतीचे मेफेड्रॉन Mephedrone (MD) जप्त करुन दोघांना अटक केली आहे. हि कारवाई गुन्हे शाखेच्या (Pimpri Chinchwad Crime Branch) अंमली पदार्थ विरोधी पथकाने (Anti Narcotics Cell Pimpri) गुरुवारी (दि.4) मोई गावातील भैरवनाथ नगर येथे केली.

याप्रकरणी इस्तियाक अब्बास चौधरी (वय-26 रा. काळेवाडी, मुळ रा. दुधवली, जि. बस्ती उत्तर प्रदेश), अब्दुलकरीम अब्दुल्ला चौधरी (वय-26 रा. कुदळवाडी, चिखली, मुळ रा. सोहरतगड, जि. सिद्धार्थनगर, उत्तर प्रदेश) यांना अटक केली आहे. तर सोमनाथ चौधरी (रा. कुदळवाडी, चिखली) याच्यावर एन.डी.पी.एस. अॅक्ट (NDPS Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस शिपाई कपिलेश कृष्णा इगवे (वय-32) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोई गावातील भैरवनाथ नगर येथील जैन हैड्रोलिक्स दुकानाच्या समोरील रस्त्याच्या कडेला दोनजण अंमली पदार्थ विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानंतर पथकाने सापळा रचून दोन जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातून तीन लाख रुपये किमतीचा 16 ग्रॅम वजनचा एमडी हा अंमली पदार्थ जप्त केला. आरोपींना ताब्यात घेऊन एमडी बाबत चौकशी केली. त्यावेळी सोमनाथ चौधरी याच्याकडून अंमली पदार्थ आणल्याची माहिती आरोपींनी दिली. पुढील तपास महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.