Cause Of Dark Lips | ‘या’ 5 वाईट सवयीमुळे तुमचे ओठ होतील काळे, जाणून घ्या सवयी आहेत तरी कोणत्या?

0

एन पी न्यूज 24 ऑनलाईन टीम – Cause Of Dark Lips | अनेक लोक ओठांच्या काळेपणामुळे त्रस्त झालेले पाहायला मिळतात. ओठ काळे होण्याच कारण अनेक वाईट सवयी आहेत. आपल्याच वाईट सवयींमुळे आपले ओठ काळे (Cause Of Dark Lips) होण्याची संभवना असते. तसेच अधिक सौंदर्य उत्पादन वापरल्यामुळे सुद्धा ओठ काळे होण्याची दाट शक्यता असते. चला तर मग जाणून घेऊया ओठ काळे होण्याच्या समस्या आणि त्यातून वाचण्याचे उपाय.

• मृत म्हणजेच डेड स्किन (Dead Skin)

आपण जसे आपल्या चेहऱ्याची काळजी घेतो, तशीच ओठांची सुद्धा काळजी घेतली पाहिजे. ओठांवरील मृत्त स्कीन म्हणजेच डेड स्किनमुळं ओठ काळे होण्याची संभावना असते. त्यामुळं ओट खराब दिसातात.

• औषधांचा दुष्परिणाम (Drug side effects)

अधिक प्रमाणात औषधांचा सेवन केल्यानं ओठांना नुकसान पोहोचतं. तसेच पेन किलर, अँटिबायोटिक औषधांमुळे ओठ काळे होतात. त्यामुळे पेन किलर किंवा अँटिबायोटिक्स सेवन जास्त प्रमाणात करू नये. त्याचे दुष्परिणाम ओठांवर होतात. (Cause Of Dark Lips)

• लिपस्टिकचा अतिवापर (Excessive use of lipstick)

अलीकडे बदलत्या जीवनशैलीमध्ये लिपस्टिक फॅशन झाली आहे. परंतु लिपस्टिकमध्ये अधिक प्रमाणात केमिकल वापरले जातात. त्यातील केमिकलमुळं ओठांना नुकसान पोहोचते. त्यामुळे ओठ काळे पडतात. तसेच लिपस्टीकमुळं ओठ निस्तेज होऊन अधिक काळे होतात.

• धूम्रपान करू नये (Don’t smoke)

धूम्रपान म्हणजे स्मोकिंग केल्यानं ओठांची त्वचा काळी पडते. जर तुम्ही स्मोक करत असाल, तर तत्क्षणी ते कमी करा. कारण त्यामुळे ओठ पूर्णपणे काळे पडतात.

• पाण्याची कमतरता (Water Scarcity)

आपल्या शरीरात पाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. पाणी कमी पिल्याने सुद्धा आपल्या ओठांच्या रंगामध्ये बदल होऊ शकतो.
साधारणत: थंडीमध्ये ही समस्या जास्त उद्भवते. थंडी असल्याकारणाने आपण पाणी कमी पितो.
मात्र कमी पाण्यामुळे ओठ काळे पडण्याची अधिक शक्यता असते. तसेच पाणी आपल्या शरीराला सतत हायड्रेट ठेवतं.

काळ्या ओठांच्या बचावासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत :

ओठांवर नेहमीच व्हॅसलिन किंवा मॉइश्चरायझर लावणे.

धूम्रपान करू नये.

शरीराला सतत हायड्रेट ठेवणे.

लिपस्टिक सारख्या केमिकल वस्तूंचा वापर करू नये.

Web Title :- Cause Of Dark Lips | causes of dark lips hyperpigmentation

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

How To Increase Breast Size | ब्रेस्ट साईज वाढवणे आणि त्यास योग्य आकार देण्यासाठी रोज करा ‘ही’ 5 कामे; जाणून घ्या

Easy Ways To Reshape Breast | बाळाला स्तनपान दिल्याने बिघडतो ब्रेस्टचा शेप, जाणून घ्या रिशेप करण्याच्या 5 सोप्या पद्धती

Cough Problem | सतत होत असेल खोकला तर चुकूनही करू नका दुर्लक्ष, जीवघेणे असू शकते कारण

Leave A Reply

Your email address will not be published.