Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; जाणून घ्या आजचा भाव

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील दोन महिन्यापासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. वर्षाच्या सुरुवातीपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सोन्याच्या किंमतीत वाढ झाली. त्याचबरोबर चांदीही वधारली असल्याचे दिसले. मात्र आज सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण झाली आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 45,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 63,200 रुपये पर्यंत पोहचली आहे.

भारतीय सराफा बाजारात आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात सोन्या-चांदीचे दर वाढताना दिसत होते. दरम्यान, त्यानंतर आता सोन्या-चांदीच्या किंमतीत घसरण झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून वाढणारा दर आता कमी होताना दिसत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर आज सोन्या-चांदीच्या भावात घसरण झाली आहे. (Gold Silver Price Today)

दरम्यान, सामान्य सोन्याचे दर आणि हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दरामध्ये कोणताही फरक नाही. तुम्हाला हॉलमार्क सोन्यासाठी कोणीही अतिरिक्त शुल्क घेत नाही. सामान्य सोने ज्या दराने विकले जाते तोच दर हॉलमार्क केलेल्या सोन्याचा असतो. तसेच, सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत.

आजचा सोन्याचा दर –

पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,650 रुपये

नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,450 रुपये

मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 45,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 49,640 रुपये

Related Posts