EPFO Pension Rule | EPFO कडून पेन्शन नियमात महत्वपूर्ण बदल ! ‘या’ दिवशी पेन्शन खात्यात जमा होणार; जाणून घ्या

0

मुंबई : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – EPFO Pension Rule | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनाने (EPFO) आपल्या पेन्शनधारक खातेदारांना एक चांगली माहिती दिली आहे. EPFO कडून पेन्शनच्या (EPFO Pension Rule) नियमात महत्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशीच पेन्शन खात्यात जमा होणार आहे. पेन्शन वेळेत जमा होत नसल्याने बहुसंख्य पेन्शन धारकांकडून तक्रार करण्यात आली होती. याचीच दखल घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.

EPFO ने घेतलेल्या या निर्णयामुळे पेन्शनधारकांना एक दिलासा मिळाला आहे. 13 जानेवारी रोजी एक परिपत्रक काढून या बदलाची माहिती EPFO ने दिली. यापुर्वी दर महिन्याला प्रथम कामकाजाच्या दिवशी पेन्शन जमा होत असे अथवा अधिकाधिक 5 तारखेच्या आत पेन्शन जमा होत होती. परंतु पेन्शनवर अवलंबून असलेल्या खातेदारांना ही अडचण निर्माण होत होती.

या पार्श्वभूमीवर EPFO पेन्शन विभागाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन पेन्शनधारकांच्या अडचणींवर विचार केला आणि पेन्शन खात्यात जमा करण्याच्या तारखेबाबतच्या नियमात बदल केले आहेत. त्यानुसार दर महिन्याच्या अखेरच्या कामकाजाच्या दिवशी थेट खात्यात पेन्शन जमा होणार आहे. त्यामुळे आता आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून संबंधित कागदपत्रे बँकांना पाठवतील, असे निर्देश EPFO कडून देण्यात आले आहेत. (EPFO Pension Rule)

 

दरम्यान, विशेष म्हणजे आर्थिक वर्षाअखेर असल्यानं मार्च महिन्या अखेर पेन्शन जमा न होता ती 1 एप्रिल अथवा त्यानंतर जमा होईल,
असं ईपीएफओनं परिपत्रकामध्ये नमुद केलं आहे. दरम्यान, पेन्शन बँक
खात्यात जमा होण्याच्या 2 दिवस आधीच ती संबधित बँकांकडे (Bank) जमा झाली आहे,
याची खात्री करणं आवश्यक असून पेन्शन वेळेत जमा होण्यासाठी सर्व आवश्यक प्रक्रिया
वेळेत पूर्ण करण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना संबधित यंत्रणेला द्याव्यात असे देखील EPFO ने आपल्या परिपत्रकात नमुद केलं आहे.

Related Posts