Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांच्या खात्यात किती असावा मिनिमम बॅलन्स? अन्यथा लागू शकते पेनल्टी; जाणून घ्या

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Minimum Balance Post office | पोस्ट ऑफिसच्या छोट्या बचत योजनांमध्ये गुंतवणूक करून लोकांना चांगला रिटर्न मिळतो. जर जोखीम टाळायची असेल तर येथे गुंतवणूक करावी. पोस्टाच्या योजनांमध्ये करमाफीपासून कर सवलतीपर्यंतचे अनेक फायदे आहेत. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत येथे गुंतवणूक योजना आहेत. (Minimum Balance Post office)

यामध्ये बँकेपेक्षा जास्त व्याज दिले जाते. तुम्हीही जोखीम न घेता गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर पोस्ट ऑफिस तुमच्यासाठी एक चांगला पर्याय असू शकतो. येथे गुंतवणूक करण्यासाठी खाते उघडावे लागेल. ज्या अंतर्गत काही किमान शिल्लक ठेवावी लागेल.

पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीम अंतर्गत, तुम्हाला वेगवेगळ्या योजनांमध्ये वेगवेगळी खाती उघडावी लागतात. ज्यामध्ये किमान शिल्लक मर्यादा बदलते. याशिवाय या योजनांमधील व्याजही वेगळे आहे. कोणत्या योजनेत खात्यात किमान शिल्लक मर्यादा आहे ते जाणून घेवूयात.

एसबी (चेक खाते)- रु. 500.

एसबी (नॉन चेक अकाऊंट) – रु 50.

एमआयएस – रु 100.

टीडी – रु 100.

PPF – रु 500.

ज्येष्ठ नागरिक – 1000 रुपये.

Related Posts