Blood Sugar Control | ‘ही’ 7 लक्षणे दिसताच व्हा सावध, जाणून घ्या अचानक कमी झाली ब्लड शुगर तर काय करावे

0

एन पी न्यूज 24 ऑनलाइन  टीम – Blood Sugar Control | ब्लड शुगर वाढणे आणि कमी होणे, दोन्ही आरोग्यासाठी घातक ठरू शकते. मधुमेह हा जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होणारा आजार आहे, ज्यामध्ये आहाराची काळजी न घेतल्यास ब्लड शुगरही कमी होऊ शकते किंवा वाढू शकते. ज्या रुग्णांची शुगर वाढते, ते विचारपूर्वक अन्न खातात, औषधोपचाराची काळजीही घेतात, पण ज्या रुग्णांची शुगर कमी असते, ते आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. कमी ब्लड शुगर (Blood Sugar Control) हा देखील हायपोग्लायसेमिया नावाचा आजार आहे.

अनेक वेळा एखादी व्यक्ती खाण्यापिण्याची काळजी न घेता तासन्तास सतत काम करते आणि कामाच्या दरम्यान थकवा आणि चिंताग्रस्त झाल्यासारखे वाटते. जर तुम्हाला असे वाटत असेल तर काळजी घ्या, हे हायपोग्लायसेमियाचे लक्षण (Hypoglycemia Cause And Symptoms) असू शकते.

जेव्हा ब्लड शुगरची पातळी कमी होते, तेव्हा शरीरात अशी लक्षणे दिसू लागतात, ज्यावरून हायपोग्लायसेमिया ओळखला जातो. त्यामुळे काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हायपोग्लाइसेमियाची लक्षणे (Hypoglycemia Symptoms)

मळमळ

अचानक घाम येणे


खूप अशक्त वाटणे


डोकेदुखी होणे


घाबरणे


चक्कर येणे आणि अस्वस्थता


शरीराचा थरकाप

शरीरात अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब ब्लड शुगर (blood sugar) ची चाचणी करा. हायपोग्लायसेमिया म्हणजे ब्लड शुगर एका विशिष्ट पातळी (blood sugar level) च्या खाली जाते. जर ब्लड शुगरची पातळी 70 mg/dl च्या खाली आली तर याचा अर्थ हायपोग्लाइसेमिया (Hypoglycemia) आहे. (Blood Sugar Control)

 

हायपोग्लायसेमियाचा उपचार (Treatment of Hypoglycemia)


1.
शरीरात अशक्तपणा किंवा अस्वस्थता जाणवत असल्यास ताबडतोब ब्लड शुगरची तपासणी करा आणि शुगर कमी झाल्यास त्वरित उपचार घ्या.


2.
जर ब्लड शुगरची पातळी 70 mg/dL पेक्षा कमी असेल आणि शुद्धीत असाल तर लगेच 15-20 ग्रॅम ग्लुकोज पाण्यात मिसळून प्या.


3.
कँडी, मिठाई किंवा फळांचा रस नेहमी सोबत ठेवा, ज्यामुळे शरीरातील ग्लुकोजची पातळी राखू शकता.


4.
हायपोग्लायसेमिया टाळण्यासाठी वेळेवर नाश्ता करा. दुपारचे जेवण आणि रात्रीच्या जेवणाची काळजी घ्या.


5.
जेव्हाही थकवा किंवा चक्कर येते तेव्हा लगेच ब्लड शुगरची चाचणी करा. जर ’लो ब्लड शुगर’ची माईल्ड केस असेल, तर गोड पदार्थ खाऊन शुगर लवकर आटोक्यात ठेवता येते.


6.
ब्लड शुगर खूप कमी असल्यास, व्यक्ती बेशुद्ध होऊ शकते, अशा स्थितीत ग्लुकोजचे इंजेक्शन घेऊ शकता.


7.
कमी ब्लड शुगरची समस्या असल्यास भूक नसेल तरी वेळेवर खा. उशीरा खाणे किंवा उपाशी राहण्याने ही समस्या वाढू शकते.


8.
ब्लड शुगरची पातळी नियमितपणे तपासा.

Web Title :- Blood Sugar Control | know the hypoglycemia cause and symptoms and how to cure it know the best tips to maintain sugar level

Join our Telegramfacebook page and Twitter for every update

Premature Wrinkles | ‘या’ चुकांमुळे पडतात चेहऱ्यावर सुरकुत्या, जाणून घ्या कारण आणि त्यावर घरगुती उपाय

Immunity Booster Tips | ‘या’ टिप्स महिलांसाठी ठरतील उपयुक्त, प्रतिकारशक्ती वाढेल आणि आजार देखील होतील दूर

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.22 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे

Leave A Reply

Your email address will not be published.