Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या ‘या’ स्कीममध्ये 333 रुपयांची गुंतवणूक केल्यास तुम्हाला 8.22 लाख रुपये मिळतील, जाणून घ्या कसे

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Post Office Scheme | पोस्ट ऑफिस स्मॉल सेव्हिंग स्कीममध्ये गुंतवणूक केल्याने तुम्हाला बँके पेक्षा जास्त रिटर्न मिळतो. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यावर अनेक फायदे व विमा लाभ देखील मिळतो. याशिवाय, काही वर्षांत, तुम्हाला अधिक निधी देखील मिळेल. तुम्हीही या (Post Office Scheme) योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी इथे एक अशी योजना आहे, जी तुम्हाला कमी गुंतवणुकीत पाच वर्षांत 8 लाखांपेक्षा जास्त रक्कम देईल. चला जाणून घेऊया पोस्ट ऑफिसच्या या खास योजनेबद्दल.

काय आहे हि पोस्ट ऑफिस स्कीम ?

पोस्ट ऑफिस हि योजना Senior Citizen Savings Scheme (SCSS) आहे. त्यावर 7.4 टक्के वार्षिक व्याज आहे, जे 31 मार्च/30 सप्टेंबर/31 डिसेंबर ठेवीच्या तारखेपासून देय आणि त्यानंतर 31 मार्च, 30 जून, 30सप्टेंबर आणि 31 डिसेंबर रोजी व्याज देय असेल. ही योजना 5 वर्षांच्या मॅच्युरिटी कालावधी सह येते. तुम्ही यामध्ये किमान रु 1000 गुंतवू शकता, तसेच तुम्ही जास्तीत जास्त रु 15 लाख रुपये हि गुंतवू शकता. त्यात एकरकमी ठेव गुंतवावी लागते. या योजनेअंतर्गत, इनकम टॅक्स कायदा 80C अंतर्गत व्याजात सूट दिली जाते.

हे लोक खाते उघडू शकतात.

या योजनेंतर्गत (Post Office Scheme), ज्यांचे वय 50 ते 60 दरम्यान आहे असा कोणताही भारतीय नागरिक खाते उघडू शकतो किंवा त्यापेक्षा कमी वयाचे लोकही त्याअंतर्गत खाते उघडू शकतात. यामध्ये सिंगल खाते तसेच जॉईन खाते उघडण्याचा पर्याय आहे. एका खात्यात जास्तीत जास्त 15 लाख रुपये गुंतवले जाऊ शकतात. जॉईन खात्यात जमा केलेली संपूर्ण रक्कम फक्त पहिल्या खातेदारालाच दिली जाईल.

या योजनेवर व्याज.

व्याज हे त्रैमासिक आधारावर दिले जाते आणि ते जमा केल्याच्या तारखेपासून 31 मार्च/30 जून/30 सप्टेंबर/31 डिसेंबरपर्यंत लागू आहे. दर तीन महिन्याला देय असलेले व्याज खातेदाराने दावा केला नसेल, तर अशा व्याजावर कोणतेही अतिरिक्त व्याज मिळणार नाही.

 

खाते बंद झाल्यावर..

Related Posts