‘या’ तीन खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद ? काँग्रेसचा इशारा

0

मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यात शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन पंधरवडा उलटला तरी अद्याप मंत्र्यांचे खातेवाटत झालेले नाही. आज याबाबत निर्णय होण्याची शक्यता असतानाच तीन महत्त्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत तीव्र मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. यावरून काँग्रेसने इशारा दिल्याचेही वृत्त आहे.

सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि जलसंधारण या तीन महत्वाच्या खात्यांवरून महाविकास आघाडीत मतभेद निर्माण झाले आहेत. सरकारमध्ये महत्त्वाची खाती मिळत नसल्याचे दिसून आल्याने काँग्रेस नाराज असल्याचे समजते. समाधानकारक खाती न मिळाल्यास सरकारमधून बाहेर पडून सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे. यामुळे खातेवाटप आणखी रेंगाळण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृह आणि नगरविकास ही दोन खाती स्वत:कडेच ठेवली आहेत. ही खाती ते नंतर कोणाला देणार? की स्वत:कडेच ठेवाणार, उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.