नाराज पंकजा मुंडे उद्या करू शकतात मोठी घोषणा ! ‘माधवबरा’ मार्गाची शक्यता

0

बीड : एन पी न्यूज 24 – राज्यातील नेतृत्वाने अन्याय केल्याची भावना असणारे भाजपमधील अनेक नेते सध्या नाराज असून त्यापैकी एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांची नावे ठळकपणे घेतली जात आहेत. खडसेंनी अन्य पक्षांच्या प्रमुखांच्या भेटीगाठी सुरू केलेल्या असतानाच आता नाराज असलेल्या पंकजा मुंडे उद्या गोपीनाथ गडावरुन मोठी घोषणा करण्याची शक्यता असल्याचे म्हटले जात आहे.

काय आहे ‘माधवबरा’ 
भाजपाचे दिवंगत नेते आणि माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी माळी, धनगर, वंजारी समुदायाला एकत्र आणत माधवचा प्रयोग केला होता. आता पंकजा या समुदायांसोबतच बंजारा आणि राजपूत समालाही एकत्र आणत माधवबरा हा प्रयोग करू शकतात, अशी शक्यता वर्तविली जात आहे. उद्या गोपीनाथ गडावरील मेळाव्यात कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या याबाबतची घोषणा करू शकतात.

पोस्टरवरून कमळ गायब  
स्व. गोपीनाथ मुंडे यांची उद्या जयंती असून यानिमित्त गोपीनाथ गडावर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच परळीत स्वाभीमान दिनही साजरा करण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाचे पोस्टर सर्वत्र लागले असले तरी पोस्टरवरून कमळ गायब झाले आहे. याबाबत पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले असता, इतके दिवस थांबलात, तर आणखी एक दिवस थांबा, असे सूचक उत्तर त्यांनी दिल्याने आता सर्वांचे लक्ष उद्याच्या कार्यक्रमाकडे लागले आहे. याच वेळी पंकजा माधवबराची घोषणा करू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.