सुप्रिया सुळेंनी नागरिकत्व सुधारणा विधेयकातील दाखवलेली चूक अमित शहांना कबुल

Supriya-Sule
11th December 2019

नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – नागरिकत्व सुधारणा विधेयकावर सोमवारी झालेल्या चर्चे दरम्यान विधेयकासंदर्भात अमित शहा यांच्या भाषणात झालेली एक चूक राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळेंनी लक्षात आणून दिली. यावेळी शहांनी ही चूक कबुल असल्याचे सांगत ती दूरुस्त केल्याचेही स्पष्टीकरण ताबडतोब दिले.

सोमवारी गृहमंत्री अमित शहांनी लोकसभेत हे विधेयक मांडले होते. उशिरा लोकसभेत हे विधेयक मंजूर झाले. विधेयकाला काँग्रेसने कडाडून विरोध केल्याने अमित शहांनी तब्बल ६ ते ७ तास या विधेयकावर चर्चा केली. यावेळी गृहमंत्री अमित शहांनी केलेल्या शेवटच्या भाषणात शहांकडून एक छोटी चूक झाली होती. ही चूक खासदार सुप्रिया सुळें यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर, शहांनी ताबडतोब चूक कबुल असल्याचे सांगत ती दूरुस्त केल्याचे स्पष्टीकरण दिल. या विधेयकाला काँग्रेससह राष्ट्रवादीनेही विरोध केला आहे.