हैदराबाद एन्काऊंटरमधील दोन मृत आरोपी अल्पवयीन, कुटुंबियांचा दावा

0

हैदराबाद : एन पी न्यूज 24 – डॉ. प्रियंका रेड्डी या तरूणीवर बलात्कार करून तिला निर्घृणपणे जाळून ठार मारणाऱ्या चार आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटरमध्ये ठार केले होते. मात्र आता या प्रकरणी अतिशय खळबळजनक माहिती समोर आली आहे. एन्काऊंटरमध्ये ठार झालेल्या आरोपींपैकी दोघे जण अल्पवयीन होते, असा दावा आरोपींच्या कुटुंबियांनी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगासमोर केला आहे. तसेच ही चकमक खोटी असल्याचे म्हटले आहे.

हैदराबाद एन्काऊंटरमध्ये ठार झालेले आरोपी हैदराबादमधील नारायणपेठ जिल्ह्यातील गुडगंडला आणि जकलैर गावातील रहिवासी होते. या आरोपींपैकी नवीन याच्या आईने नवीन हा १७ वर्षांचा होता, असे मानवाधिकार आयोगाला सांगितले आहे. तर दुसरा आरोपी शिवा याचे वडील जे. रंजना यांनी चकमकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी ही चकमक खोटी असल्याचे म्हणत मुलगा अल्पवयीन असल्याचा दावा केला आहे. अन्य दोन आरोपी चेन्नाकेशवुलू आणि मोहम्मद आरिफ यांच्या कुटुंबानेही मुलांना खोट्या चकमकीत मारल्याचे आयोगा समोर म्हटले आहे. दरम्यान, हैदराबाद बलात्कारकांड आणि एन्काऊंटर पुन्हा एकदा वादात सापडले आहे.
visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.