मोदी सरकारची वाटचाल; ‘मेक इन इंडिया’ ते ‘रेप इन इंडिया’ : काँग्रेस

0
नवी दिल्ली : एन पी न्यूज 24 – भाजपने ज्या देशाची ओळख मेक इन इंडिया करून देण्याचा प्रयत्न केला होतो, तो भारत आता रेप इन इंडिया कडे निघाला आहे, अशी संतप्त टीका काँग्रेस खासदार अधीर रंजन चौधरी यांनी आज लोकसभेत केली आहे. खासदार चौधरी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व विषयांवर बोलतात, पण महिलांवर होत असलेल्या अत्याचारांबाबत ते गप्प आहेत. भारत मेक इन इंडिया वरून आता रेप इन इंडिया बनत आहे.
चौधरी यांनी शुक्रवारी उन्नाव बलात्कार आणि जळीतकांडावरून सरकारला धारेवर धरले होते. चौधरी यांनी म्हटले होते की, एकीकडे राम मंदिर उभारले जात आहे, तर दुसरीकडे सीता मातेला जाळले जात आहे. उन्नावची पीडित मुलगी ९५ टक्के जळाली होती. या देशात काय चालले आहे? असा प्रश्न त्यांनी विचारला होता. दरम्यान मंगळवारी लोकसभेत गृहमंत्री अमित शाह आणि अधीर रंजन चौधरी यांच्यात जोरदार वादविवाद झाला. सभागृहात सध्या काश्मिरमधील परिस्थिवर चर्चा सुरू आहे.

visit : npnews24.com
Leave A Reply

Your email address will not be published.