आईच्या समलैंगिक संबंधामुळे कुटुंबाला मिळाली नाही प्रतिष्ठा, आता मुलगी झाली पंतप्रधान!

PM

एन पी न्यूज 24 – फिनलँडच्या पंतप्रधानपदी अवघ्या ३४ वर्षांच्या सना मरीन या लवकरच विराजमान होणार आहेत. ५७ वर्षीय पंतप्रधान एन्टी रिने यांच्या पदावर त्यांना पक्षाने संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे एका महिलेला कमी वयात एका देशाचे सर्वोच्चपद मिळणार आहे. सना मरीन लहानपणी एका भाड्याच्या घरात आईसोबत राहात होत्या. नंतर त्यांच्या आईचे एका महिलेशी समलैंगिक संबध सुरू झाले. या संबंधांमुळे सना यांच्या कुटुंबाला समाजकडून कधीही प्रतिष्ठा मिळाली नाही.

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM
एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत सना यांनी म्हटले आहे की, मी माझ्या कुटुंबाविषयी उघडपणे बोलू शकत नव्हते. यामुळे मला माझे अस्तित्व अनुभवता येत नव्हते. मी स्वताला अयोग्य समजू लागले होते. मित्रांसोबत मी मजा करू शकत नव्हते. कुटुंबाची आर्थिक स्थितीही चांगली नव्हती. विद्यापीठात शिकणारी कुटुंबातील मी पहिली मुलगी होते. मात्र, मला आईचे खुप सहकार्य मिळत होते. तिने मला खुप विश्वास दिला. मी आतापर्यंत महिला असण्याचा कधीही विचार केला नाही. नेहमी राजकारणात ज्यामुळे आले त्या गोष्टींचाच विचार केला. माझ्या आईचे समलैंगिक संबंध असल्याने कुटुंबाला समाजात कधीही प्रतिष्ठा मिळाली नाही, अशी खंत सना यांनी व्यक्त केली आहे.

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

समलैंगिक रिश्ते में रहीं मां, फैमिली को नहीं मिलती थी इज्जत, बेटी बनी PM

visit : npnews24.com