कोणत्या ऋतूत? कोणत्या भाज्या खाव्यात? खाऊ नयेत?

0

पुणे : एन पी न्यूज 24 – प्रत्येकाच्या आहारात निश्चितच फरक असतो. कोणत्या ऋतूत कोणती भाजी खावी, याबाबत अनेकांना माहिती नसते. हल्ली सिझन नसताना देखील सगळ्या प्रकारच्या भाज्या उपलब्ध होतात. वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या कोणत्या, कुठल्या ऋतूत खाव्यात, याविषयी खाली माहिती खालीलप्रमाणे.

उन्हाळ्यात काय खावे खाऊ नये

कांदा, लसूण, बटाटा, सुरण, रताळे, बीट यांसारख्या कंदभाज्या उन्हाळ्यात खाणे हितकारक असते. मधुमेहींनी बटाटा, रताळे, बीट मात्र वर्ज्य करावेत.

पावसाळ्यात काय खावे, खाऊ नये

भेंडी, ढोबळी, वांगी, टोमॅटो, यांसारख्या फळभाज्या पावसाळ्यात खाणे योग्य ठरेल.या भाज्या कॅन्सरप्रतिरोधी अँटिऑक्‍सिडंट असल्याने फायदेशीर, परंतु ज्यांना किडनी विकार आहेत त्यांनी हे न खाणेच उत्तम.

लाल, दुधी भोपळा, कारले, पडवळ, दोडका या वेलभाज्या उन्हाळा आणि पावसाळ्यात खाव्यात.
स्थूल, बैठी जीवनपद्धती असलेल्या, स्तनदा महिलांना, धमनीविकार असलेल्यांना, वयस्कर लोकांना या भाज्या खाणे जास्त उपयुक्त ठरेल.

हिवाळा आणि उन्हाळ्यात पालेभाज्या फायदेशीर

मेथी, पालक, शेपू, राजगिरा, माठ या पालेभाज्या हिवाळा आणि उन्हाळ्यात खाणे फायदेशीर असते.
मलविरोध, ऍसिडिटी, स्थूल, गर्भवती व बैठी जीवनपद्धती असणाऱ्यांनी पालेभाज्या आवर्जून खाव्यात. किडनी विकार असणाऱ्यांनी मात्र या भाज्या टाळाव्यात.

हिवाळ्यात काय खावे, खाऊ नये

शेवगा, मटार, घेवडा, गवार, वाल- पावटे अशा शेंगभाज्या खाण्यासाठी हिवाळा योग्य ऋतू आहे.
गॅसेस, मलावरोधाचा त्रास असणाऱ्यांनी मात्र या अजिबात खाऊ नये. हायकोलेस्टेरॉल, उच्चरक्तदाब, मधुमेहींना या भाज्या खाणे फायदेशीर ठरेल.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.