‘एमआयएम’ ने जाहीर केले ३ उमेदवार

0

औरंगाबाद : एनपी न्यूज 24 – वंचित बहुजन आघाडीबरोबरील युती तुटल्याचे पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी जाहीर केल्यानंतर एमआयएमने विधानसभा निवडणुकीसाठी आपले ३ उमेदवार जाहीर केले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी ही घोषणा केली आहे. कोणत्याही पक्षाकडून जाहीर झालेले हे पहिलेच उमेदवार ठरले आहेत.

पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातून डॅनियल रमेश लांडगे, मालेगाव सेंट्रलमधून मुफ्ती मोहमद इस्माईल अब्दुल खालीक आणि नांदेड उत्तरमधून मोहमद फिरोज खान (लाला) यांची नावे जाहीर केली आहेत.

लोकसभा निवडणूकीत वंचित विकास आघाडीबरोबर एमआयएमने युती केली होती. त्याचा फायदा एमआयएमला होऊन इम्तियाज जलील हे औरंगाबादमधून लोकसभेवर निवडून गेले. मात्र, त्याचवेळी वंचितच्या उमेदवारांना एमआयएमची मते मिळाली नसल्याचा आरोप वंचितचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केला होता. विधानसभा निवडणुकीत वंचितने एमआयएमला केवळ ८ जागा देऊ केल्या होत्या. त्यामुळे एमआयएमने युती तोडल्याची घोषणा केली. त्याला मंगळवारी असदउद्दीन ओवेसी यांनी दुजोरा दिल्यानंतर एमआयएमच्या तीन उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.