बुलेटवरून पत्नीसह ‘थाटामाटात’ निघालेले मंत्री महोदय आले ‘गोत्यात’ !

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवीन मोटार वाहन कायदा लागू झाल्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना भारी दंड आकारला जात आहे. सामान्य माणूस किंवा मंत्री यांच्यावर कठोर कारवाई केली जात आहे. राजस्थान सरकारच्या एका मंत्र्याचे चलानही कापण्यात आले आहे. प्रकरण राजस्थानमधील बारा जिल्ह्यातील आहे. येथे प्रमोद जैन भाया हेल्मेटशिवाय पत्नीसमवेत मोटारसायकलवरून जात होते.

यावर वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने त्याचे 200 रुपयांचे दंड आकारला. दंडावरनुसार प्रमोद जैन भाया यांनी बारा प्रताप चौकात हेल्मेट घातले नव्हते. याशिवाय त्यांच्या पत्नीनेही हेल्मेट घातले नव्हते.

1 सप्टेंबरपासून केंद्रीय मोटार वाहन कायद्यांतर्गत नवीन तरतुदी आणल्या गेल्या आहेत ज्या अंतर्गत नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल भारी दंड आकारला जाऊ शकतो. परंतु राजस्थानमध्ये गेहलोट सरकारने अद्याप त्यास अधिसूचित केले नाही, यामुळे जुन्या तरतुदींतर्गत राज्यात अजूनही दंड रक्कम लागू केली जात आहे.

याच आठवड्यात राजस्थान सरकारने केंद्रीय मोटार वाहन कायद्यातील नवीन तरतुदींनुसार वाढीव दंडाची रक्कम कमी करण्याचा निर्णय घेतला. राजस्थानचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की जे काही अव्यवहार्य आहे,त्याची दंड रक्कम खूपच जास्त आहे, ती कमी केली जाईल.

Leave A Reply

Your email address will not be published.