नव्या संकटात इम्रान खान, पाकिस्तानला बसणार 6 अरब डॉलरचा ‘झटका’ ?

0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सध्या पाकिस्तानला आर्थिक संकटाने बेहाल केले आहे. पकिस्तानची वित्तीय महसूली तूट मागील 8 वर्षापेक्षा अधिक आहे. त्यामुळे पाकिस्तानला आयएमएफकडून मिळणाऱ्या 6 अरब डॉलरच्या सहाय्यता निधीसंबंधित प्रश्न चिन्ह उपस्थित झाले आहे.

IMF काही दिवसानंतर सहाय्यता निधीसाठी पहिल्यांदा पाहणी करण्यासाठी जाणार आहे. IMF ने अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी अनेक अटी ठेवल्या आहेत. परंतू पाकिस्तान या अटींची पूर्तता करु शकत नाही.

वित्तीय तूट वाढली –

पाकिस्तानची वित्तीय तूट देशाच्या एकूण GDP च्या 8.9 टक्कांपर्यंत पोहचली आहे. मागील वर्षी ही तूट 6.6 टक्के होती. इम्रान खानचे सरकार याला जबाबदार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे सरकारने वित्तीय तूट जीडीपीच्या 5.6 टक्के सीमित ठेवण्याचे लक्ष ठेवले आहे. सरकारचे वित्तीय तूटीचे लक्ष 82 टक्के वाढवण्यात आले आहे.

या तिमाहीत आयएमएफचे लक्ष पूर्ण झाले नाही तर सरकार टॅक्स वाढवण्यासाठी एक नवे बजट आणण्याची शक्यता आहे. पाकने आतापर्यंत अनेक खर्चांवर बंधने आणली आहेत. यासाठी पाकमधील इंधनाच्या किंमती देखील वाढवल्या आहेत.

6 अरब डॉलरचा झटका –

एकीकडे पाकिस्तानचा खर्च वाढत आहे तर दुसरीकडे उत्पन्न कमी होती आहे. जुलै महिन्यात सरकारचा खर्च 40 टक्क्यांनी वाढला आहे. जर पाकिस्तान सरकारने खर्चात कपात नाही तर IMF 6 अरब डॉलरचे पॅकेज रद्द करण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.