NDA Modi Govt | स्वयंपाक घरासाठी गुड न्यूज, आता भाज्यांवर लक्ष ठेवणार सरकार, भाव वाढल्यास हस्तक्षेप करणार

0

नवी दिल्ली : NDA Modi Govt | देशात वाढणारी अन्न महागाई सरकारसाठी एक आव्हान बनली आहे. याचा जोरदार फटका मोदी सरकारला लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) बसला आहे. आता अन्न महागाई नियंत्रित करण्यासाठी सरकार आवश्‍यक वस्‍तुंच्या यादीत १६ नवीन नावांचा समावेश करण्यावर विचार करत आहे. भाज्यांना सुद्धा देखरेख यादीत टाकण्याची सरकारची योजना आहे.

आवश्‍यक वस्‍तुंच्या यादीत समाविष्ठ वस्तुंच्या किमतीवर सरकार लक्ष ठेवते. लक्ष ठेवल्याने त्यांच्या दरात होत असलेले चढ-उतार समजण्यास मदत होते. सोबतच दर जास्त वाढल्यास सरकार दर नियंत्रित करण्यासाठी हस्तक्षेप सुद्धा करते.

माहितीनुसार, भाज्यांच्या किमतीत सर्वात जास्त चढ-उतार होतो. यासाठी मुल्य देखरेखीच्या १६ व्या संभाव्य वस्तुंमध्ये भाज्यांचा देखील समावेश होऊ शकतो. सध्या सरकारच्या देखरेख यादीत २२ वस्‍तुंचा समावेश आहे. आणखी १६ वस्तुंचा यामध्ये समावेश केल्यास ही संख्या वाढून ३८ होईल.

देशभरातील १६७ केंद्रातून या वस्तुंच्या घाऊक आणि किरकोळ किमती रोज एकत्रित केल्या जातात आणि त्यांचे विश्‍लेषण केले जाते. आवश्‍यक वस्‍तुंचे दर वाढल्यास सरकार हस्तक्षेप करून दर नियंत्रित सुद्धा करू शकते. या हस्तक्षेपाला मुल्‍य स्थिरीकरण कोष अथवा मूल्‍य समर्थन योजनेसारख्या योजनांद्वारे पुढे आणले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.