Maharashtra Assembly Elections 2024 | विधानसभेला भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण? राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा

0

मुंबई : Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) राज्यात भाजपाला (BJP) मोठा फटका बसला. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भाजपाकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे न करताच प्रचार केला जाणार असल्याची माहिती मिळत आहे. फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वात विधानसभा निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे म्हंटले होते.

आता मात्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे शिंदे यांचाच नव्हे तर स्वतःचा चेहराही मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून या निवडणुकीत पुढे आणणार नाहीत. एकूणच भाजपाचा (BJP) यंदाचा प्रचार मुख्यमंत्री पदाचा चेहरा अंधारात ठेऊनच असणार आहे. मराठा आंदोलन (Maratha Reservation Andolan), शेतकरी प्रश्न याचा लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठा फटका बसला.

लोकसभा निवडणुकीपूर्वी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदाचे दावेदार समजले जात होते. लोकसभेच्या निकालाने आता मुख्यमंत्री पदाचा चेहरा अस्पष्ट करूनच विधानसभेचा प्रचार करण्याचा निर्णय भाजपने घेतलेला आहे. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने (Congress) भाजपाला मागे टाकले आहे. विधानसभेत भाजपाचे १०० पेक्षा अधिक आमदार असूनही लोकसभेला ९ जागा आल्या आहेत.

तर काँग्रेसचे विशाल पाटील यांच्या पाठिंब्यासह १४ खासदार आहेत. त्यामुळेच आगामी विधानसभा निवडणुकीत फडणवीसांचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा पुढे ठेवण्याची शक्यता कमी झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.