Pune Pimpri Chinchwad Crime News | पिंपरी: फ्लॅट विक्रीच्या बहाण्याने 77 लाखांची फसवणूक, दाम्पत्यावर FIR

0

पिंपरी : – Pune Pimpri Chinchwad Crime News | फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवून (Lure Of Flat) कायदेशीर करार करुन बँकेचा बोजा कमी करुन घेतला. मात्र, फ्लॅट नावावर करुन न देता 77 लाखांची फसवणूक (Cheating Fraud Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसांनी एका दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 23 मे 2023 ते 11 जून 2024 या कालावधीत पिंपळे सौदागर (Pimple Saudagar) येथील ओरिएंट सोसायटीत घडला आहे.

याबाबत अमित अशोक कपुर (वय-40 रा. पिंपळे सौदागर) यांनी मंगळवारी (दि.11) सांगवी पोलीस ठाण्यात (Sangvi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन सविता रविंद्र बाजारे व रवींद्र बाजारे (दोघे रा. सुंदरम बिल्डींग, वाघेरे हाईटस, पिंपरी गाव) यांच्यावर आयपीसी 406, 420, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी कट रचून संगनमत करुन पहिल्यांदा फिर्यादी यांना फ्लॅट विकण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी यांच्याबरोबर एम.ओ.यु. व अॅग्रीमेंट टु सेल असा कायदेशीर करार करुन विश्वास संपादन केला.

यानंतर एल अँड टी फायनान्स कंपनीला 71 लाख रुपये भरण्यास सांगितले. फिर्यादी यांनी आरोपींवर विश्वास ठेवून 71 लाख रुपये फायनान्स कंपनीला दिले. तसेच अॅग्रीमेंट टु सेल करण्यासाठी रजिस्ट्रेशन फी 5 लाख 83 रुपये असे एकूण 76 लाख 83 हजार रुपये फिर्यादी यांनी भरले. त्यानंतर आरोपींनी फ्लॅटवरील बँकेचा असलेला कर्जाचा बोजा कमी करुन घेतला. आरोपींनी स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी फिर्यादी यांच्यासोबत केलेल्या कायदेशीर कराराप्रमाणे न वागता विश्वासघात करुन आर्थिक फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.