Hadapsar Pune Crime News | सख्या भावानेच आजारी असणाऱ्या बहिणीचा खून करून रचला आत्महत्या केल्याचा बनाव; हडपसर येथील घटना

0

हडपसर : Hadapsar Pune Crime News | पुण्यात सख्या भावानेच आपल्या लहान बहिणीचा खून केल्याची घटना समोर आली आहे. सुरुवातीला भावाने तिने आत्महत्या (Suicide Case) केल्याचा बनाव रचला होता. मात्र पोलिसांच्या तपासात भलतंच समोर आलं. आजारी असणाऱ्या बहिणीचा भावानेच खून केल्याचे निष्पन्न झालं. (Murder In Hadapsar Pune)

हा संपूर्ण प्रकार हडपसरच्या वैदुवाडी (Vaiduwadi Pune) परिसरात घडला आहे. सुरुवातीला या प्रकरणात अकस्मात मयत म्हणून नोंद करण्यात आली होती. मात्र आता भावा विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साफिया सुलेमान अन्सारी (वय १६, रिद्धी सिद्धी अपार्टमेंट, वैदुवाडी हडपसर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा भाऊ शारिख सुलेमान अन्सारी (वय १८) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक केली आहे. याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत साफिया आजारी असायची. तिच्यावर कुटुंबियांकडून उपचारही केले जात होते. मात्र तिच्यात काही फरक पडत नव्हता. घरात असताना ती आक्रमक व्हायची. घरातील सदस्यांच्या अंगावर धावून जायची.

घटनेच्या दिवशी म्हणजेच १७ जून रोजी देखील असाच प्रकार घडला. मयत साफिया भाऊ शारीखच्या अंगावर त्याला मारण्यासाठी धावून गेली. दोघात झटापट झाली. त्यानंतर रागाच्या भरात शारीख याने गळा दाबला. यात साफीयाचा मृत्यू झाला.

त्यानंतर आपल्या हातातून गुन्हा घडल्याचे लक्षात आल्यानंतर शारीख घाबरला. आपले कृत्य लपवण्यासाठी त्याने घरातच साफियाला गळफास दिला आणि आत्महत्या केली असे भासवण्याचा प्रयत्न केला.

पोलिसांना ही घटनेची माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले मात्र त्याआधीच साफियाचा लटकलेला मृतदेह खाली काढण्यात आला होता.

सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद म्हणून दाखल करण्यात आली होती. मात्र त्यानंतर पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने खून केल्याची कबूली दिली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) मोडवे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.