Loni Kalbhor Pune Crime News | पुणे : दुप्पट परतावा देण्याचे आमिष, तरुणाची 9 लाखांची फसवणूक; दाम्पत्यावर गुन्हा दाखल

0

पुणे : – Loni Kalbhor Pune Crime News | शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक (Investment In Share Market) केल्यास त्यावर दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून (Lure Of Double Money) एका तरुणाची 8 लाख 89 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे (Cheating Fraud Case). याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी (Loni Kalbhor Police Station) एका दाम्पत्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2022 ते ऑगस्ट 2023 या कालावधीत कदमवाक वस्ती (Kadam Wak Wasti) येथील एका मोबाईल शॉपीत घडला आहे.

याबाबत अमोल राजाराम गायकवाड (वय-32 रा. कासुर्डी ता. दौंड) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन तरुण उपाध्याय Tarun Upadhyay (वय-41), मोनिका तरुण उपाध्याय Monica Tarun Upadhyay (वय-40 रा. आनंद विहार सोसायटी, कवडीपाट टोलनाका, कदमवाक वस्ती) यांच्यावर आयपीसी 420, 406, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यावर चांगला परतावा मिळतो असे सांगितले. तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्यास दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. आरोपींवर विश्वास ठेवून फिर्य़ादी यांनी 8 लाख 89 हजार रुपयांची गुंतवणूक केली. मात्र, त्यानंतर आरोपींनी कोणत्याही प्रकारचा परतावा अथवा गुंतवलेली रक्कम परत न करता फसवणूक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

ट्रॅव्हलर्स मॅनेजरकडून फसवणूक

विमाननगर : बनावट बिल (Bogus Bill) सादर करुन कंपनीची पावणे पाच लाखांची फसवणूक करण्याचा प्रयत्न करुन कंपनीचे 75 हजार रुपयांचे नुकसान केले. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी (Viman Nagar Police Station) निना सिंग (रा. रोहन मिथीला, विमाननगर) यांच्यावर आयपीसी 406, 420, 467, 468, 471, 427, 511 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रविचंद्र टंगीराला (वय-42 रा. गिगा आयटी स्पेस जवळ, विमानगर) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात बुधवारी फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते फेब्रुवारी 2024 या कालावधीत विमाननगर येथील हॅरोक इंजीनियरिंग प्रा. लि. येथे घडला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.