Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्त्यावर थरार ! अल्पवयीन मुलाला गोळ्या झाडून मारण्याचा प्रयत्न (Video)

0

पुणे : Sinhagad Road Pune Crime News | सिंहगड रस्ता परिसरात एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडून जिवे मारण्याचा प्रयत्न (Attempt To Murder) केल्याची घटना घडली आहे. सुदैवाने गोळ्या दुसरीकडे फायर झाल्याने तो अल्पवयीन मुलगा थोडक्यात बचावला आहे (Firing In Sinhagad Road). ही घटना शनिवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास अभिरुची मॉल (Abhiruchi Mall Pune) जवळ असलेल्या एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाजवळ घडली.

घटनेची माहिती मिळताच सिंहगड रस्ता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याबाबत सविस्तर वृत्त असे की, सिंहगड रस्ता परिसरातील एका राजकीय पदाधिकाऱ्यांच्या जनसंपर्क कार्यालयाबाहेर दोन अल्पवयीन मुले बसली होती. दरम्यान सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास तीन तरूणांनी तिथे येऊन यातील एका अल्पवयीन मुलावर गोळ्या झाडल्या. सुदैवाने त्या अल्पवयीन मुलाने मान खाली केल्याने हल्लेखोरांचा नेम चुकला. त्यांनतर ते हल्लेखोर तिथून पसार झाल्याची माहिती त्या अल्पवयीन मुलाने पोलिसांना सांगितली आहे.

घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पाटील, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभारआदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करून तपासाबाबत सूचना केल्या. पुढील तपास सिंहगड रस्ता पोलीस करीत आहेत.

मात्र पोलिसांना घटनास्थळी आरोपींनी गावठी पिस्टल मधून गोळी झाडल्यानंतर पडणारी पुंगळी अद्यापपर्यंत आढळून आली नसल्याने खरच फायरिंग झाली आहे का? याबाबत पोलीस तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.