Katraj PMPML Bus Accident | कात्रज येथे दोन पीएमपीएमएल बसच्या मध्ये सापडून कर्मचाऱ्याचा मृत्यू

0

पुणे: Katraj PMPML Bus Accident | कात्रज-हिंजवडी बस (Katraj-Hinjewadi PMP Bus) टोइंग करून काढण्यासाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराचा जागीच मृत्यू झाला. गणेश गुजर ( वय ४२ रा. कोथरूड, मुळ गाव, भोर ) असे मृत्यू झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे नाव आहे.

गुजर हे कंत्राटी मकॅनिक कामगार म्हणून कात्रज आगारात काम करत होते. कात्रज हिंजवडी बस बंद पडल्याने ती बस दुसऱ्या पीएमपीएल बस द्वारे टोईंग करुन बाजूला घेत होते.

बस बाजूला घेताना टोईंग करण्यासाठी लावलेला रॉड सटकला व दोन बसच्या मध्ये सापडून गणेश गुजर या कंत्राटी कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ही दुर्घटना घडताच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे (Bharti Vidyapeeth Police Station) व वाहतूक विभागाचे कर्मचारी घटना स्थळी दाखल होत मृतदेह पुढील तपासणी साठी ससून येथे पाठवण्यात आला.

अधिकचा तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. बस बंद पडलेली असताना पीएमपीएल प्रशासनाने ती बस टोईंग व्हॅनने टोईंग न करता बसने का टोईंग केली टोईंग करताना योग्य ती काळजी का घेण्यात आली नाही असा सवाल नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.