Sharad Pawar NCP | ‘…तर रस्त्यावरच गोळी घालेन’ शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची भाजप आमदाराला धमकी

0

चाळीसगाव : Sharad Pawar NCP | चाळीसगावमध्ये राज्य सरकार विरोधात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात महाविकास आघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या आंदोलनाप्रसंगी बोलताना भाजपा आमदार मंगेश चव्हाण (BJP MLA Mangesh Chavan) यांना राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने भर सभेत गोळ्या घालण्याची धमकी दिली आहे. या धमकीचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे पदाधिकारी असलेले किसन जोरवेकर यांनी म्हटलं की, या तालुक्यात जी गुंडगिरी सुरु झाली याची अनेक उदाहरणे तुम्हाला माहिती आहेत. मला देखील दमबाजी करण्यात आली होती. मलाही संपवण्याची धमकी दिली होती. पण मात्र माझं वय ७३ वर्ष आहे. मला कॅन्सर झाला आहे, मधुमेह झाला आहे.

त्यामुळे माझ्या नादी लागाल तर पिस्तुल आणेल आणि गोळ्या घालून टाकेन. मला काय जास्त जगायचं नाही. मला चार वेळा जीवदान मिळालेलं आहे.” दरम्यान जोरवेकर यांच्या या वक्तव्याची दखल घेऊन पोलीस काही कारवाई करणार का ? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.