Vijay Shivtare | ‘चौथीत असताना मी बिड्या प्यायचो, चक्कर येऊन पडायचो… ‘; विजय शिवतारेंचे वक्तव्य चर्चेत (Video)

0

सासवड : Vijay Shivtare | माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सासवडमधील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात आपल्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. मात्र याबाबत त्यांनी केलेले खुलासे यामुळे अनेक जणांच्या भुवया उंचावल्या आहेत.

लहानपणी आपण बिड्या प्यायचो असा खळबळजनक खुलासा शिवतारे यांनी केलेला आहे. सासवडमधील आचार्य अत्रे सभागृहात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला त्यांनी हजेरी लावली. त्यावेळी माजी मंत्री शिवतारे बोलत होते.

शिवतारे म्हणाले की, “लहानपणी मी खूप वांड होतो. प्रचंड बंडखोर..प्रचंड..म्हणजे, चौथीत बिड्या प्यायचो मी, तुम्हाला कुणाला विश्वास बसेल का? गुरं वळायला जायचं, गुरं सोडायची… चालत हरकुळला जायचं… आईच्या पिशवीतले चार आणे चोरायचे, बिडीचं बंडल आणायचं, दोन-चार बिड्या प्यायलो की, चक्कर येऊन पडायचो. असा बंडखोर प्रवृत्तीचा मी होतो.

पण एक होतं… तरीदेखील मी पहिल्या क्रमांकावर होतो. मी कधीही अभ्यास करत बसायचो नाही. तुम्ही आताही शाळेत गेलात, तर माझं नाव आहे तिथे. माझा हजेरी क्रमांकही असा होता ना…एक दिवस मी डुप्लिकेट स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट काढण्यासाठी शाळेत गेलो. जो हजेरी क्रमांक कधीही बदलत नाही.” असे खुलासे शिवतारे यांनी केले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची सध्या चर्चा होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.