Wagholi Pune Accident News | वाघोलीत एसटी बसची पादचाऱ्याला धडक; पादचाऱ्याचा जागीच झाला मृत्यू

0

शिक्रापूर : (सचिन धुमाळ) – Wagholi Pune Accident News | वाघोली मध्ये एस टी बसची पादचाऱ्याला धडक बसल्याने ४० वर्षीय पादचाऱ्याचा जागीच मृत्यु झाल्याची घटना पुणे नगर महामार्गावर एस बी आय बँकेसमोर समोर घडली.

राजगुरुनगर ते पैठण ही बस होती. अपघातातील मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, तो पादचारी पुणे नगर महामार्ग ओलडत होता. राजगुरुनगर ते पैठण ही बस नगरच्या दिशेने जात होती. त्याला बस ची धडक बसली. मागील चाकाखाली आल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताच्या ठिकाणी रक्ताचा सडाच पडला होता. अपघाताची माहिती कळताच लोणीकंद पोलीस व लोणीकंद वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहचले.

मृत व्यक्तीला ससून रुग्णालयात हलवून बस रस्त्यातून हटविली. या अपघातामुळे वाहतूक कोंडी झाली होती. बस हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. पोलीसांनी रक्त सांडलेल्या भागावर माती टाकली. यानंतर पाण्याच्या टँकर च्या सहाय्याने तो भाग धुवून घेतला.

लोणीकंदचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर हे ही अपघात स्थळी पोहेचले. अपघातानंतर बस चालक पळून गेला होता. नंतर तो पोलीस ठाण्यात आला. वाहतूक कर्मचारी जितेंद्र पवार, स्वप्नील गालफाडे व अन्य कर्मचाऱ्यांनी वाहतूक सुरळीत केली.

Leave A Reply

Your email address will not be published.