18th Lok Sabha Session | 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन उद्यापासून सुरु होणार

0

दिल्ली : 18th Lok Sabha Session | केंद्रात एनडीएने सरकार (NDA Modi Govt) स्थापन केले दरम्यान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. अठराव्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सोमवार (दि. २४ जून) पासून सुरू होणार आहे.

ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींसह नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. त्यानंतर हंगामी अध्यक्षांची निवड होईल आणि दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधित करतील.

सोमवारी (दि. २४ जून) सकाळी ११ वाजता पंतप्रधान मोदी आणि त्यांचे मंत्रिमंडळ शपथ घेणार आहेत. बुधवारी २६ जून रोजी लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू २७ जून रोजी दोन्ही सभागृहांच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणार आहेत.

सोमवारी (दि.२४ जून) पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळासह २८० नवनिर्वाचित खासदार शपथ घेतील. तर २६४ नवनिर्वाचित खासदार दुसऱ्या दिवशी मंगळवारी (दि.२५ जून) शपथ घेतील.

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी २ जुलै रोजी लोकसभेला संबोधित करणार आहेत. ते ३ जुलै रोजी राज्यसभेत बोलणार आहेत. संसदेच्या कनिष्ठ सभागृहात म्हणजेच लोकसभेत भाजपला सभापतीपद मिळण्याची शक्यता आहे,

तर उपसभापतीपद एनडीएच्या मित्रपक्षांपैकी एकाला दिले जाऊ शकते. इंडिया आघाडीने उपसभापती पदाची मागणी केली आहे, जे परंपरेने नेहमी विरोधकांकडे जाते. मात्र, १७ व्या लोकसभेत एकही उपसभापती नव्हता.

Leave A Reply

Your email address will not be published.