Kondhwa Pune Crime News | कोंढव्यातील धक्कादायक प्रकार! वादाचा बदला घेण्यासाठी सोसायटीच्या सेक्रेटरीकडून काळी जादू

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | किरकोळ कारणवारुन झालेल्या वादाचा बदला घेण्यासाठी सोसायटीच्या सेक्रेटरी आणि त्याच्या मुलाकडून सोसायटीत राहणाऱ्या एका कुटुंबावर तंत्रमंत्राच्या सहाय्याने काळी जादू (Black Magic) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा प्रकार कोंढवा परिसरातील एका उच्चभ्रू सोसायटीत घडला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी सोसायटीचा सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्याचा मुलगा (रा. पिकासो पॅराजाईज अपार्टमेंट, साळुंखे विहार, कोंढवा) यांच्यावर जादूटोना प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याबाबत रुपेश अग्रवाल (वय- 46, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश अग्रवाल आणि सोसायटीचे सेक्रेटरी राजकुमार जोशी आणि त्यांचा मुलगा हे तिघेही पिकासो पॅराडाईज अपार्टमेंट (Paradise Apartment Kondhwa) या सोसायटीमध्ये राहतात. रुपेश अग्रवाल व त्यांचे वडील राजेंद्र अग्रवाल 14 मार्च 2024 रोजी सकाळी ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाले होते. त्यावेळी सोसायटीचे गेट उघडण्यासाठी वॉचमन हजार नव्हता. फिर्यादींनी सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना वॉचमन गेटवर का नाही? असे विचारले असता वॉचमन माझी गाडी धुण्यासाठी दुसऱ्या सोसायटीमध्ये गेल्याचे त्यांनी सांगितले.

यावर सेक्रेटरी राजकुमार जोशी यांना वॉचमनला तुम्ही वैयक्तिक कामासाठी का पाठवता? असे विचारले. याचा राग मनात धरून जोशी यांच्या मुलाने फिर्यादी व त्यांच्या वडिलांना शिवीगाळ करून तुम्हा दोघांना बघुन घेतो अशी धमकी दिली. तसेच त्यांच्या विरुध्द खोटा गुन्हा दाखल केला. तक्रारदार व त्याच्या कुटूंबीयांना मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने जोशी यांच्या मुलाने काळी जादू करण्याच्या उद्देशाने वेळोवेळी गेटवर लिंबु ठेवुन व स्वस्तिक वर काळी बाहुली जाळुन जादुटोणा करून अग्रवाल यांच्या कुटुंबियांच्या मनात भिती निर्माण केल्याचे फिर्यादीत नमूद केलेले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.