Kondhwa Pune Crime News | पुणे : प्रशिक्षणार्थी अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचार, फुटबॉल प्रशिक्षकाला अटक

0

पुणे : – Kondhwa Pune Crime News | अल्पवयीन फुटबॉलपटू वर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्याप्रकरणी प्रशिक्षकावर रविवारी (दि.9) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा धक्कादायक प्रकार कोंढवा येथे 7 जून पूर्वी उंड्री येथील आंबेडकर चौक शेजारी घडला आहे. याप्रकरणी फुटबॉलचे प्रशिक्षण देणाऱ्या प्रशिक्षकावर (Football Coach) पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

याबाबत पिडीत 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीच्या आईने कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन यश हेमंत जैन Yash Hemant Jain (वय-25 रा. जगदंबा रोड, मार्वल आयडीएल स्पेशिओ, आंबेडकर चौक शेजारी, उंड्री) याच्यावर आयपीसी 376/2/एन, 376/2/एफ, पोक्सो अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी यश जैन फुटबॉलचे प्रशिक्षण देतो. फिर्यादी यांची 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी आरोपी यश याच्याकडे फुटबॉल प्रशिक्षण घेते. यश याने कोचिंग देण्याच्या बहाण्याने मुलीसोबत जवळीक वाढवली. तिला घरी बोलवून घेत अश्लील व्हिडीओ दाखवले. तसेच तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. याबाबत पिडीत मुलीने आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पिडीतेच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करुन आरोपी यश याला अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक मोहसिन पठाण (API Mohsin Pathan) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.