Shikrapur Pune Crime News | पान टपरी धारकांचे धाबे दणाणले ! पोलिसांकडून दोघांवर गुन्हे दाखल

0

शिक्रापूर – (सचिन धुमाळ) : Shikrapur Pune Crime News | पुणे ग्रामीण पोलीस दलातील शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीतील (Shikrapur Police Station) सणसवाडी (ता. शिरुर) Sanaswadi येथे तरुणानांना आकर्षण ठरणारे गुंगीकरण असे व मानवी जीवितास धोका निर्माण करणारे पान विक्री करणाऱ्या दोन पान दुकानांवर शिक्रापूर पोलिसांनी छापा टाकत कारवाई केली आहे. त्यामुळे अशा नशेली पानांची विक्री करणाऱ्या पान टपरी धारकांचे धाबे दणाणले आहेत. या कारवाईत गौरव पांडुरंग खळदकर व चंद्रकांत बापू मोहिते या दोघांवर आयपीसी कलम ३२८ नुसार गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे

याबाबत शिक्रापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सणसवाडी ता. शिरुर येथील मुख्य चौकत काही पान दुकानांमध्ये मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर वापरुन पानामध्ये टाकून गुंगीकरण पान विक्री केली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांना मिळाली, त्यांनतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र पानसरे, पोलीस शिपाई जयराज देवकर, निखील रावडे यांनी सणसवाडी येथे जात छापा टाकला ,या कारवाईत सरदार पान शॉप व पाटील पान दरबार शॉप येथे पानामध्ये गुंगीकारक अशी उग्र वासाची मानवी जीवितास धोका निर्माण करणारी पावडर टाकून पानांची विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले, यावेळी पोलिसांनी दोन्ही ठिकाणांहून पावडर जप्त करत पान दुकानदारांना ताब्यात घेतले. शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई जयराज वसंत देवकर रा. शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने पोलिसांनी सरदार पान शॉपचे चालक गौरव पांडुरंग खळदकर वय २८ वर्षे रा. बजरंगवाडी शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे मूळ रा. खळद ता. पुरंदर जि. पुणे व पाटील पान दरबार शॉपचे चालक चंद्रकांत बापू मोहिते वय २८ वर्षे रा. सणसवाडी ता. शिरुर जि. पुणे या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक केशव वाबळे हे करत आहे.

तर याबाबत बोलताना शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी सांगितले की शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कोठेही गुंगीकारक व धोकादायक पावडर वापरुन पान बनवून विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करत गुन्हे दाखल करणार आहे.

पुणे ग्रामीण पोलीस दला बरोबरच पुणे शहरालगत देखील अनेक ठिकाणी अशा प्रकारे गुंगीकारक नशा येणाऱ्या पानांची खुलेआम विक्री होत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आता पुणे शहर पोलीस आयुक्त देखील अशा गुंगीकारक नशेली पानांची विक्री करणाऱ्या पान शॉप वरती कारवाई करण्याचे आदेश देणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.