Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणात आता ससून रुग्णालयातील शिपायाला अटक

0

पुणे : Kalyani Nagar Accident Case | कल्याणीनगर अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाच्या रक्त तपासणीच्या अहवालात फेरफार (Blood Sample Tampering) केल्याबाबत पुणे पोलिसांच्या (Pune Police) गुन्हे शाखेने (Pune Crime Branch) ससून रुग्णालयातील (Sassoon Hospital) डॉ.अजय तावरे (Dr Ajay Taware) आणि डॉ. श्रीहरी हरलोर (Dr Shrihari Halnor) या दोघांना अटक केली होती.

त्यांनतर आता या डॉक्टरांना पैसे पोहोचवण्यासाठी मदत करणाऱ्या ससून रुग्णालयाच्या शिपायाला देखील अटक करण्यात आली आहे. अमित घटकांबळे (Amit Ghatkamble) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून तो ससून रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागात काम करतो.

वडगाव शेरीतून (Vadgaon Sheri) स्विफ्ट कारमधून तीन लाख रुपये तो घेऊन आला असल्याचे तपासात उघड झाले आहे . याबाबत आता त्याला न्यायालयात दाखल करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.