Praniti Shinde On Devendra Fadnavis | ‘निवडणुकी दरम्यान सोलापुरात दंगल घडवण्याचा प्लॅन होता’; प्रणिती शिंदेंचा फडणवीसांसह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप

0

सोलापूर : Praniti Shinde On Devendra Fadnavis | लोकसभा निवडणुकीत (Solapur Lok Sabha) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. या आरोपामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालया आहेत.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आणि भाजपाचे राम सातपुते आमने सामने होते. मात्र यामध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी बाजी मारली. भाजपच्या राम सातपुते यांचा त्यांनी पराभव केला. निवडणुकीनंतर आता आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

लोकसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांचा सोलापुरात दंगली घडवण्याचा प्लॅन होता, असा आरोप त्यांनी केला आहे. मतदानाच्या दोन दिवस आधी या गोष्टी घडवण्याचा प्रयत्न झाला. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर कृतज्ञता मेळाव्यात बोलताना खासदार प्रणिती शिंदे हा खळबळजनक आरोप केला आहे.

जिल्ह्यात येऊन गावा-गावांमध्ये येऊन भांडणं आणि दंगल लावण्याचा प्रयत्न ते करणार होते. याचं उदाहरण तुमच्या समोर आहे. मतदानाच्या दिवशी पोलिंग बूथवर काय झालं होतं. पोलीस आयुक्तांनी सांगितलं होतं, बाहेर जा अन्यथा मला उमेदवारावर गुन्हा दाखल करावा लागेल, असं प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

भाजपवाल्यांना कळलं होतं की ही निवडणूक हातातून गेली आहे. आता एकच उपाय आहे ते म्हणजे दंगल लावा, त्यांनी निवडणुकांच्या भाषणातूनही तसेच सांगितले असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.