Mahayuti- Maharashtra Assembly Elections 2024 | अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवायही महायुती बळकट?; आकड्याच्या गणितात राष्ट्रवादीची गरज संपुष्टात?

0

पुणे : Mahayuti- Maharashtra Assembly Elections 2024 | लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) तोंडावर अजित पवारांनी (Ajit Pawar) आपले काका शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी फारकत घेत महायुतीत सहभागी होऊन आपली वेगळी चूल मांडली. महायुतीतून अजित पवार गटाने चार जागा लढवल्या, तर त्यांच्या कोट्यातून एक जागा रासपला देण्यात आली.

बारामती लोकसभा मतदारसंघात त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. रायगडमधून प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) हे एकमेव उमेदवार विजयी झाले. दरम्यान त्यांना आता राज्यसभेचे खासदार करण्यात आले आहे. भारतीय जनता पक्षाची (एकनाथ शिंदे यांच्या) शिवसेनेसोबत असलेली युती भावनिक आहे, तर (अजित पवार यांच्या) राष्ट्रवादी काँग्रेससोबत असलेली युती ही स्ट्रॅटेजिक आहे, असं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) माध्यमांशी बोलताना म्हणाले होते.

लोकसभेला अजितदादांचा एकच खासदार निवडून आलेला असल्यामुळे राष्ट्रवादीची एनडीएला तशा अर्थाने गरज नाही. मुळात महाराष्ट्रातही ती कधीच नव्हती, मात्र आता भविष्यात ती त्याहून नसेल, असे संकेत मिळत आहेत.अजित पवारांच्या राष्ट्रवादीशिवायही महायुती बळकट आहे.

२८८ जागा असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमताचा आकडा १४५ आहे. तर सध्याची महायुतीची ताकद २०३ आहे. त्यातून अजित पवारांचे ४० आमदार वजा केले, तरी १६३ हा मोठा आकडा राहतो. म्हणजे भाजप अधिक शिंदेंची शिवसेना अधिक अपक्ष यांच्या साथीने महायुती मजबूत आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रातूनही अजित पवारांशी केलेल्या युतीवरून भाजपावर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. त्यात लोकसभेत निवडून आलेल्या खासदाराला मंत्रीपद मिळाले नाही त्यामुळे हे सर्व चित्र अजित पवार महायुतीत नकोच असा आशय प्रकट करणारी आहेत.

Mahayuti, Maharashtra Assembly Elections, Lok Sabha Election,Ajit Pawar,Sharad Pawar,Devendra Fadnavis, लोकसभा निवडणुक, अजित पवार, शरद पवार, बारामती लोकसभा, सुनेत्रा पवार, रायगड, Sunil Tatkare,सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस,Devendra Fadnavis, देवेंद्र फडणवीस, खासदार, भाजप,

Leave A Reply

Your email address will not be published.