Prices Of Tur Chana Urad Dals | जुलैमध्ये कमी होऊ शकतात तुर, चना आणि उडीद डाळीचे भाव, चांगला मान्सून आणि आयात वाढण्याचा होईल लाभ

moong-dal

नवी दिल्ली : Prices Of Tur Chana Urad Dals | केंद्रीय ग्राहक प्रकरणांच्या सचिव निधी खरे यांनी शुक्रवारी म्हटले की, चांगल्या मान्सूनची आशा आणि आयातीमधील वाढीने पुढील महिन्यात तुर, चना आणि उडीद डाळीचे दर कमी होण्याची शक्यता आहे. पुढील महिन्यापासून या तीनही डाळींची आयात सुद्धा वाढेल. यामुळे देशांतर्गत पुरवठा वाढवण्यात मदत होईल.

खरे यांनी पत्रकारांना सांगितले की, तुर, चना आणि उडीद डाळींचे दर मागील सहा महिन्यांपासून स्थिर आहेत. परंतु उच्च स्तरावर आहेत. मूग आणि मसूर डाळीचे दर ठीक आहेत. १३ जून रोजी चना डाळीचा सरासरी कोरकोळ दर ८७.७४ रुपये प्रति किलोग्रॅम, तुर १६०.७५ रुपये प्रति किलोग्रॅम, उडीद १२६.६७ रुपये प्रति किलोग्रॅम, मूग ११८.९ रुपये प्रति किलोग्रॅम आणि मसूर डीचा भाव ९४.३४ रुपये प्रति किलोग्राम होता.

ग्राहक प्रकरण विभाग ५५० प्रमुख ग्राहक केंद्रातून किरकोळ किरकोळ दर एकत्र करतो. खरे यांनी म्हटले की, जुलैपासून तुर, उडीद आणि चना डाळीचे दर कमी होण्याच्या शक्यता आहे. हवामान विभागाने सामन्य मान्सून पावसाची शक्यता वर्तवली आहे. बाजारात डाळींना मागणी असल्याने शेतकरी डाळींचे पेरणी क्षेत्र वाढवतील. भारत चना डाळ ६० रुपये प्रति किलोग्रॅमने विकण्याची सरकारची योजना सामान्य लोकांना दिलासा देत आहे.

खरे यांनी सांगितले की, भारताने मागील आर्थिक वर्षात जवळपास ८ लाख टन तुर आणि ६ लाख टन उडीद डाळ आयात केली. म्यानमार आणि अफ्रीकी देश भारताचे प्रमुख निर्यातदार आहेत.