Dombivali MIDC Blast | डोंबिवली दुर्घटनेत 6 कामगारांचा मृत्यू तर 30 जण जखमी; मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता (Videos)

0

डोंबिवली: Dombivali MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसीत कंपनीत आज दुपारी 1 वाजताच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटाचे हादरे डोंबिवलीत अनेक किलोमीटर पर्यंत जाणवले. दरम्यान अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग नियंत्रित आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्वाला आणि धुराचे लोट मोठे असल्याने बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे.

डोंबिवली एमआयडीसीत कंपनीत झालेल्या स्फोटात सहा कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून जवळपास तीस कामगार जखमी झाले आहेत. त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. उद्योगमंत्री उदय सामंत (Uday Samant) आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे (Shrikant Eknath Shinde) यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित यंत्रणेला सूचना केल्या आहेत.

सहा कामगारांचा मृत्यू…

सध्याच्या माहितीनुसार या दुर्घटनेत सहा कामगार मृत्युमुखी पडल्याची माहिती आहे. धूर आणि आग मोठी असल्याने मृत्यूचा आकडा नेमका सांगता येत नाही. तसेच मृतांच्या नातेवाईकांना शासनाकडून मदत करण्यात येईल ,कोणालाही वाऱ्यावर सोडले जाणार नसल्याचे उदय सामंत यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.